बँके तर्फे करण्यात आले संपूर्ण भारतात ८,८०० हून अधिक सायबर फसवणूकी विषयी जागरुकता निर्माण करणार्या कार्यशाळांचे आयोजन
ऑक्टोबर २०२६, मुंबई- ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबरच सायबर गुन्ह्यांपासून त्यांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या योजनेचा एक भाग तसेच ‘सायबर फ्रॉड सुरक्षा’ या उपक्रमाअंतर्गत एचडीएफसी बँके तर्फे संपूर्ण भारतात ८,८०० हून अधिक जागरुकता कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळा जुलै – ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या व त्यांचा लाभ हा देशभरांतील १.८ लाख नागरिकांनी घेतला.
या मोहिमेचा उद्देश हा ग्राहकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक सायबर गुन्ह्यांच्या बाबत जागरुक करण्यासह सुरक्षित डिजिटल बँकिंगच्या पध्दतीं विषयी माहिती देऊन सुरक्षित डिजिटल पध्दतींची निर्मिती करण्यात योगदान देणे हा आहे.
या कार्यशाळांच्या माध्यमातून शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थी, वरिष्ठ नागरीक, रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन्स (आरडब्ल्यूएज), कॉर्पोरेट कार्यालये, सामाजिक संस्था, स्वयंसहायता गट, ग्राहक आणि कर्मचार्याना शिक्षण देण्यात येते. या संभाषणात्मक अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी लोकांना सुरक्षित डिजिटल बँकिंगच्या पध्दतींसह कशा प्रकारे सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याच्या पध्दतीं विषयी माहिती देण्यात येते.
या कार्यशाळांमध्ये खरी उदाहरणे, गोष्टी आणि व्हिडिओजच्या माध्यमातून सहभागी लोकांना गुन्हेगारांची कार्यपध्दती आणि त्यांच्यापासून बचाव करण्याच्या टिप्स सुध्दा देण्यात येतात.
या कार्यशाळांमध्ये डिजिटल सुरक्षे विषयीच्या विविध प्रकारच्या विषयां वर माहिती देण्यात येते :
१. गुन्हेगारांच्या पध्दतींना ओळखणे : या सत्रामध्ये कशा प्रकारे गुन्हेगार पिडीत लोकांना आधुनिक गुन्ह्यांच्या पध्दती जसे डिजिटल अरेस्ट, इन्व्हेस्टमेंट स्कॅम, जॉब स्कॅम, एपीके फाईल स्कॅम, किंवा क्यूआर कोड स्कॅम इत्यादी विषयी च्या गोष्टी आणि प्रत्यक्ष घटनांबद्दलची माहिती देण्यात येते.
२. सुरक्षित नेट बँकिंग साठी प्रत्यक्ष टिप्स : या कार्यशाळांमध्ये सुरक्षित नेट बँकिंग च्या माध्यमातून सुरक्षित व्यवहार कसे करावते याचे महत्त्व अधोरेखित करण्यात येते, व्हिजिल आंटी सारख्या जागरुकता ॲम्बेसेडर आणि कशा प्रकारे सोप्या टिप्स वापरुन सुरक्षित ऑनलाईन खरेदी कशी करावी या विषयी टिप्स देण्यात येतात.
३. प्रतिबंधात्मक उपाय : उपस्थितांनी आपला ओटीपी, सीव्हीव्हीज, डेबिट/क्रेडिट कार्डाची माहिती आणि यूपीआय पिन्स सारखी माहिती कोणास देऊ नये याबद्दल माहिती देण्यात येते.
या विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट इंटेलिजन्स आणि कंट्रोल चे सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट श्री मनीष अग्रवाल यांनी सांगितले “ सायबर गुन्हेगारी हा एक गंभीर समस्या आहे, आणि जागरूकतेच्या अभावामुळे अनेकदा लोक सायबर फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. या मोहिमेचा उद्देश सहभागींना फसवणूक करणारे विविध प्रकारे कशा पद्धतीने फसवणूक करतात आणि त्यांनी कोणत्या सुरक्षित बँकिंग पद्धतींचे पालन करावे याबाबत शिक्षित करणे हा होता, जेणेकरून ते सतर्क राहून अशा फसव्या पद्धतींबद्दल जागरूक असतील आणि अशा घोटाळ्यांना बळी पडण्यापासून त्यांचा बचाव होईल.”
बँक ग्राहकांना डिजिटल व्यवहार करताना सावध राहण्याचे आणि सुरक्षित बँकिंगच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन करत असून त्याच बरोबर त्यांची गोपनीय बँकिंग माहिती कोणाशीही शेअर करणे टाळण्याचे ही आवाहन करत आहे. एखादा ग्राहक फसवणुकीला बळी पडल्यास, त्यांनी त्वरित त्यांच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि १९३० वर कॉल करावा (राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्ट पोर्टलचा हेल्प
लाइन नंबर).


