Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedनशामुक्त भारत अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा संपन्न*

नशामुक्त भारत अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा संपन्न*

 

 

पुणे, दि. २३: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत’ ‘Reimagining Prevention and Drug Demand Reduction’ या विषयावर विभागीय शिखर परिषद व कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली.

 

या कार्यक्रमास समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे, प्रमुख अतिथी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.

 

कार्यशाळेत व्यसनमुक्ती, अमली पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध, जनजागृती आणि पुनर्वसन याबाबत चर्चा करण्यात आली. विविध विभागांच्या प्रतिनिधींनी उपक्रमांचे सादरीकरण करून व्यसनमुक्तीसाठी विभागीय समन्वय व लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments