Sunday, October 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाज सुसंस्कृत ठेवण्याची जबाबदारी महिलांवरही ज्येष्ठ साहित्यिक ज्योत्स्ना चांदगुडे यांचे प्रतिपादन;...

समाज सुसंस्कृत ठेवण्याची जबाबदारी महिलांवरही ज्येष्ठ साहित्यिक ज्योत्स्ना चांदगुडे यांचे प्रतिपादन; आदिश जैन फाउंडेशनच्या वतीने नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान

पुणे : महिलांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःची प्रतिमा बदलली असून, आज प्रत्येक क्षेत्रात त्या नाव कमावत आहेत. मात्र, हे करताना समाजातील सुसंस्कृतपणा हरवता कामा नये. आपली संस्कृती आपणच जपायला हवी. समाज सुसंस्कृत ठेवण्याची आणि कुटुंबव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी महिलांवरही आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ज्योत्स्ना चांदगुडे यांनी केले.

 

आदिश जैन फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदिश जैन फाउंडेशनच्या अध्यक्ष मृणाल जैन, म. भा. चव्हाण, श्रीपाल ललवणी, डॉ. दिलीप गरुड, राजश्री सोले, साधना शेळके, नंदा देवडीकर आणि नीता तुपारे उपस्थित होते.

 

मनीषा नहार, कांचन सरोदे, अश्विनी कांबळे, मनीषा गोसावी, अंजली भिडे, बिजूबाई अडागळे, मोनिका महेकरे, डॉ. उज्ज्वला सहाणे आणि प्रियांका बोरा यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीच्या जोरावर स्वतःची वेगळी वाट निवडणाऱ्या आणि त्यात यशस्वी ठरलेल्या या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 

ज्योत्स्ना चांदगुडे म्हणाल्या, महिला कुटुंब सांभाळताना घरातील अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडतात. आजची स्त्री घरासोबतच नोकरी आणि छंदही जोपासत आहे. मात्र, हे करताना मुलांवर चांगले संस्कार होतात की नाही, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या कपड्यांपासून ते लग्न आणि मूल नको, अशा मानसिकतेपर्यंतच्या बदलांचा विचार करण्याची गरज आहे.

 

अॅड. प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या, हा पुरस्कार सोहळा खऱ्या अर्थाने दुर्गोत्सव आहे. कठीण काळात कुटुंब सांभाळणाऱ्या महिला खऱ्या दुर्गा आहेत. त्यांनी प्रचंड कष्ट करून आपल्या कुटुंबाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढले. मात्र, दुसरीकडे काही घटनांमुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात येत असल्याचे दिसते. ही व्यवस्था सावरण्यासाठी महिलांनी आपल्यातील दुर्गा जागृत करून एकत्र आले पाहिजे. संघटित होऊन इतर महिलांमध्येही जागृती निर्माण करण्याची गरज आहे. मृणाल जैन यांनी प्रास्ताविक केले. उमा व्यास व वंदना घाणेकर यांनी सूत्रसंचलन केले. राजश्री सोले यांनी आभा

र मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments