भारत, २७ ऑक्टोबर २०२६ : भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. लोकांचे जीवन अधिक सोयीचे आणि एकमेकांशी जोडलेले होत आहे. त्यामुळे प्रगत सुरक्षा व्यवस्थेची गरजही वाढली आहे. भारतात तयार होणारी सुरक्षा उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत, ती विश्वासार्ह असावीत आणि त्यांचा वापर सहज करता यावा, यासाठी भारतातील सुरक्षा आणि पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांच्या क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड ‘सीपी प्लस’ने प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
ही केवळ ब्रँडशी संबंधित भागीदारी नाही. आत्मविश्वास, नवनवीन तंत्रज्ञान आणि परस्परविश्वास या समान मूल्यांवर ती आधारित आहे. घराघरांमध्ये, व्यवसायांच्या ठिकाणी, विविध संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सीपी प्लस आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. लाखो लोकांना अधिक सुरक्षित ठेवण्याच्या या प्रयत्नांना या भागीदारीमुळे नवी दिशा मिळेल.
आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे ‘सीपी प्लस’चा व्हिडिओ सुरक्षा उत्पादने तयार करणारा देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक कारखान्यांपैकी एक कारखाना आहे. कंपनीकडे एसटीक्यूसी प्रमाणित सुरक्षा उत्पादनांचा देशातील सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. तसेच, भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांना कंपनीचा सातत्याने पाठिंबा आहे. या सर्वांमुळे सीपी प्लस हा भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह तंत्रज्ञान ब्रँडपैकी एक बनला आहे.
रणवीर सिंग हे त्यांच्या खास शैलीतील अभिनयासाठी आणि दमदार सादरीकरणासाठी ओळखले जातात. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ‘सीपी प्लस’चे उद्दिष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. देशभरातील लोकांना आधुनिक सुरक्षा उपाय सहज उपलब्ध व्हावेत, ते त्यांच्या गरजांशी संबंधित असावेत आणि अधिकाधिक लोकांनी त्यांचा वापर करावा, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
या भागीदारीविषयी रणवीर सिंग म्हणाले, “सीपी प्लससोबत काम करताना मला आनंद होत आहे. हा ब्रँड भारताच्या सुरक्षा क्षेत्रात सातत्याने नवे मापदंड ठरवत आहे. घरे, कामाची ठिकाणे आणि समाज अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. सीपी प्लस भारतासाठी खास तयार केलेल्या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने या क्षेत्रात पुढे जात आहे. भारतात सुरक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या या ब्रँडचा भाग होता येत आहे, याचा मला आनंद आहे.”
या भागीदारीविषयी ‘सीपी प्लस’चे व्यवस्थापकीय संचालक आदित्य खेमका म्हणाले, “विश्वासार्ह तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनवणे, हे सीपी प्लसचे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे. आज तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींचे संरक्षण करण्यासाठी आधुनिक सुरक्षा यंत्रणा किती उपयुक्त आहेत, याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणेही तितकेच गरजेचे आहे.
रणवीर सिंग यांचे सीपी प्लस परिवारात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि लाखो लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता या गोष्टी आमच्या ब्रँडच्या विचारांशी जुळणाऱ्या आहेत. या भागीदारीच्या माध्यमातून भारतात तयार होणाऱ्या आधुनिक सुरक्षा उत्पादनांची माहिती आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायची आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांनी ‘सीपी प्लस’वर दाखवलेला विश्वास आणखी वाढवायचा आहे.”
भारतातील सुरक्षा क्षेत्रात बदल घडवून आणण्याच्या दिशेने ‘सीपी प्लस’ची वाटचाल सुरू आहे. या भागीदारीमुळे ब्रँडच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. जागतिक दर्जाचे नवे तंत्रज्ञान आणि भारतात विकसित केलेली उत्पादने यांची सांगड घालण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या भागीदारीतून सीपी प्लस आणि रणवीर सिंग आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाबद्दल लोकांमध्ये विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतील. तसेच, प्रत्येकासाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी व्यक्ती, व्यवसाय आणि विविध संस्थांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी ते प्रोत्साहन देतील.
आज सीपी प्लस देशभरातील लाखो ठिकाणांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. यामध्ये घरे, दुकाने, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, वाहतूक व्यवस्था, सरकारी इमारती आणि महत्त्वाच्या आस्थापनांचा समावेश आहे. नवीन तंत्रज्ञान, भारतातच होणारे उत्पादन आणि देशभरातील विस्तृत वितरण व्यवस्था यांच्या मदतीने सीपी प्लस सुरक्षा क्षेत्रात नवे बदल घडवीत आहे. भारताचे भविष्य अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करीत आहे.


