पुणे,10 एप्रिल 2024 : इंडिया यामाहा मोटर प्रा.लि.ने आपल्या द कॉल ऑफ द ब्ल्यू या ब्रँड मोहिमेअंर्तगत एमटी-15 व्ही2,फॅसिनो आणि रे झेड आर पोर्टफोलिओ मध्ये नवीन रंग,ग्राफिक्स आणि वैशिष्ट्यांची भर घातली आहे.एमटी -15 श्रेणी आता सायबर ग्रीन रंगाच्या पर्यायात देखील उपलब्ध असेल.याशिवाय सायन स्टॉर्म डीएलएक्स कलर स्कीमच्या ग्राफिकल एनहान्समेंटमध्ये देखील उपलब्ध असेल.एमटी-15 व्ही2 डीएलएक्स मॉडेलमध्ये हॅझार्ड फंक्शन समाविष्ट केले आहे.याशिवाय डार्क मॅट ब्ल्यू,मेटालिक ब्लॅक,आईस फ्ल्यू व्हर्मिलिऑन, रेसिंग ब्ल्यू आणि मेटालिक ब्लॅक हे सध्याचे रंग देखील सुरू राहतील व ग्राहकांना विस्तृत पर्याय मिळेल.
फॅसिनो 125 एफआय हायब्रिडमध्ये देखील नवीन सायन ब्ल्यू, मॅट,कॉपर,सिलव्हर,मेटालिक व्हाईट रंग हे डिस्क आणि ड्रम व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील.कुल ब्ल्यू मेटालिक व विविड रेड पर्याय हे 2024 साठी ग्राहकांना नवे पर्याय उपलब्ध करून देतील.


