Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे ऑक्टोबर २०२६ अखेर १७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त... 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे ऑक्टोबर २०२६ अखेर १७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त… 

 

 

 

 

पिंपरी, दि. ३० ऑक्टोबर २०२६:- महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवातून, कौशल्यातून आणि समर्पित भावनेतून शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला बळ मिळाले असून, त्यांनी केलेले कार्य आणि दिलेली सेवा सदैव स्मरणात राहील. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यात त्यांनी निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवनाचा आनंद घ्यावा, अशा शुभेच्छा सह आयुक्त मनोज लोणकर यांनी दिल्या.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आयोजित सोहळ्यात ऑक्टोबर २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले १६ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले १ असे एकूण १७ अधिकारी व कर्मचारी यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

 

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,संगणक अधिकारी उज्वला गोडसे,लघुलेखक सुनिता पळसकर,मनिषा कामथे,कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

 

 

 

माहे ऑक्टोबर २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उपअभियंता (स्थापत्य) विकास घारे, लघुलेखक (उच्चस्तर) वैशाली गायकवाड, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, कार्यालय अधीक्षक सरिता मारणे, मनोज शिंदे, सिस्टर इनचार्ज हेमलता लेंभे, बबीता वळसे, इले. मोटार पंप ऑपरेटर राजेंद्र भुरे, शिपाई वनिता क्षीरसागर, रायन्ना अनमोल, मजूर नजमुल्ला सिध्दकी, चंद्रकांत जगताप, सुधीर वडमारे, भालचंद्र राव, काळूराम वाघमारे आणि अशोक शेलार यांचा समावेश आहे.

 

तर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्यांमध्ये सिस्टर इनचार्ज कमला गायकवाड यांचा समावेश आहे,सेवानिवृत्तांच्या योगदानाबद्दल या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments