Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedबारामती येथे ४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन* ...

बारामती येथे ४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन* *युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन*

 

पुणे, दि. १ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, टी.सी. कॉलेज, बारामती आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी टी.सी. कॉलेज, बारामती येथे करण्यात आले आहे.

 

महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य, कविता लेखन तसेच विकसित भारत चॅलेंज अंतर्गत पीपीटी सादरीकरण या स्पर्धांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्यांना प्रावीण्य प्रमाणपत्र व बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. पीपीटी सादरीकरणातून सहा स्पर्धकांची राज्यस्तरीय सहभागासाठी निवड करण्यात येईल.

 

या स्पर्धांसाठी १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती पात्र असतील. स्पर्धकांनी प्रवेश अर्जासोबत आधारकार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक असून, शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच सर्व स्पर्धकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य आहे. VBYLD-२०२६ मधील सांस्कृतिक विभागात राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवा यावर्षी स्पर्धेसाठी पात्र राहणार नाहीत.

 

इच्छुक कलाकार व स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत व्हॉट्सॲपद्वारे किंवा dsopune6@gmail.com या ई-मेलवर सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी श्रीमती अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी (मो. ७३८७८८०४२७) व सोमनाथ कदम (मो. ८८८८४६०४८६) यांच्याशी संपर्क साधावा. पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कला अकादमी व विविध संस्थांमधील इच्छुक कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments