पुणे/महाराष्ट्र, ३ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्रातील दिवाळीच्या अभ्यंगस्नानाच्या समृद्ध परंपरेचा गौरव करत डाबर आल्मंड हेअर ऑइलने एक विशेष सणासुदीचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये समाजाभिमुख कार्यक्रम, उत्पादनाची बाजारपेठेतील उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न आणि कौटुंबिक नातेसंबंध व नव्या सुरुवातींचा संदेश देणाऱ्या हृदयस्पर्शी डिजिटल चित्रपटाचा समावेश आहे. या माध्यमातून ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासोबतच केसांची योग्य निगा राखण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करणे, हे ब्रँडचे उद्दिष्ट आहे.
नरक चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाणारी दिवाळीची अभ्यंगस्नान परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या परंपरेनुसार, धार्मिक विधीपूर्वक स्नान करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्य केसांना आणि शरीराला पोषक तेल लावतात. ही परंपरा आरोग्य, नवचैतन्य आणि सणाच्या स्वागताची तयारी यांचे प्रतीक मानली जाते. या परंपरेला असलेले सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, दरवर्षी दिवाळीच्या आधी महाराष्ट्रात केसांच्या तेलाच्या मागणीत मोठी वाढ होते.
या पार्श्वभूमीवर डाबरकडून पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत लोहगाव येथे असलेल्या विद्यालय क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांसाठी समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, स्वतःची निगा राखणे आणि केसांची योग्य काळजी घेण्याच्या सवयींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ३०० शालेय विद्यार्थ्यांना डाबर आल्मंड हेअर ऑइलचे वाटप करण्यात येत आहे. लहान वयापासूनच स्वतःच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्याच्या सवयी विकसित व्हाव्यात तसेच विद्यार्थ्यांचे सर्वांगीण कल्याण साधले जावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या प्रसंगी डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत वाघमारे, शिक्षक मुक्ता पवार, नितीन वाणी, मारुती पोटे, जयश्री गेंगजे, दत्तात्रय आढाव, मनीषा नाईकवाडी, भीमराव रणधीर, वैभव गुलिंग, प्रशांत वाघमारे, आशा मोरे, वैशाली खांदवे, नीता काकडे, मेघा राणी माळगे, उपस्थित होते..
दिवाळीच्या काळात वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी, विशेषतः वितरण व्यवस्था मर्यादित असलेल्या भागांमध्ये उत्पादनाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, डाबरने महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष वितरण वाहने तैनात केली आहेत. ही वाहने स्थानिक उप-वितरकांकडून उत्पादनांचा साठा उपलब्ध करून घेतात आणि नियमित वितरण व्यवस्था मर्यादित असलेल्या बाजारपेठेपर्यंत डाबर आल्मंड हेअर ऑइल पोहोचवतात. याशिवाय, सणासुदीच्या काळात ग्राहकांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी विक्री केंद्रांवरील आकर्षक ब्रँडिंग, किरकोळ विक्री केंद्रांमधील उत्पादनांची ठळक दृश्यता आणि प्रत्यक्ष बाजारपेठेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांवरही भर दिला जात आहे.
या मोहिमेला भावनिक स्पर्श देण्यासाठी डाबर आल्मंड हेअर ऑइलने एक मराठी डिजिटल चित्रपटही सादर केला आहे. अभ्यंगस्नानाच्या परंपरेच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या चित्रपटात कौटुंबिक पाठिंबा, प्रेम आणि आयुष्यातील नव्या संधींचा हृदयस्पर्शी संदेश देण्यात आला आहे.
महाराष्ट्रीय कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात पुनर्विवाहाद्वारे आयुष्याची नवी सुरुवात करणाऱ्या सुनेला प्रेमाने साथ देणाऱ्या सासूची कथा मांडण्यात आली आहे. अभ्यंगस्नानापूर्वी केसांना तेल लावण्याच्या परिचित परंपरेतून हा चित्रपट प्रेम, स्वीकार आणि भावनिक आधार यांचे सुंदर दर्शन घडवतो. त्याचबरोबर, आपल्या प्रिय सणाच्या परंपरेकडे पाहण्याचा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोनही मांडतो.
या उपक्रमाबाबत बोलताना डाबर इंडिया लिमिटेडच्या हेअर केअर विभागाचे विपणन प्रमुख श्री. अंकुर कुमार म्हणाले, “दिवाळीचे अभ्यंगस्नान हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या अर्थपूर्ण विधी आणि परंपरांच्या माध्यमातून आजही कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. आमच्या एकात्मिक उपक्रमाद्वारे दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील ग्राहकांना डाबर आल्मंड हेअर ऑइल सहज उपलब्ध व्हावे, तसेच शालेय उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये केसांची योग्य निगा राखण्याच्या आरोग्यदायी सवयी विकसित व्हाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. आमचा नवीन अभ्यंगस्नानावरील चित्रपट प्रेम, स्वीकार आणि नव्या सुरुवातींच्या मूल्यांचा गौरव करतो. या मूल्यांमुळे पिढ्यान्पिढ्या कौटुंबिक नाती अधिक दृढ होत असतात आणि सणांचा खरा आनंद अधोरेखित होतो.”
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. सांस्कृतिक परंपरांशी असलेली नाळ, बाजारपेठेतील उत्पादनांची वाढीव उपलब्धता, समाजाभिमुख उपक्रम आणि उद्देशपूर्ण कथाकथन यांची सांगड घालत डाबर आल्मंड हेअर ऑइल ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करत आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्राच्या दिवाळी उत्सवाच्या केंद्रस्थानी असलेल्या समृद्ध परंपरांचाही हा ब्रँड गौरव करत आहे.


