‘इंडिया इन मोशन’ संकल्पनेवर आधारित – ‘आर्ट फॉर होप’चा सीझन ६ देशभरातील कलाकार, कारागीर आणि कला समूहांना अर्ज करण्याचे आवाहन करत आहे
§ अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असून hyundaiartforhope.com वर सुरू आहे.
§ आर्ट फॉर होप – सीझन ६ अंतर्गत देशभरातील उदयोन्मुख कलाकार, कारागीर आणि सर्जनशील संस्थांना सक्षम करण्यासाठी ५० अनुदाने दिली जाणार.
§ निवडक लाभार्थ्यांना आर्थिक पाठबळ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, राष्ट्रीय स्तरावरील ओळख आणि आर्ट फॉर होप फेस्टिव्हलमध्ये आपली कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी मिळणार.
§ स्थापनेपासून आतापर्यंत आर्ट फॉर होपने २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २०० हून अधिक कलाकारांना साहाय्य करत २.२० कोटी रुपये मूल्याची अनुदाने वितरित केली.
§ या उपक्रमाने ७५ हून अधिक पारंपारिक आणि लोककला प्रकारांना प्रोत्साहन दिले आहे, आपल्या वार्षिक फेस्टिव्हलद्वारे ३५,००० हून अधिक प्रेक्षकांना जोडले आहे; ज्यामध्ये पहिल्यांदाच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ६१ टक्के प्रेक्षकांचा समावेश आहे.
गुरुग्राम | नोव्हेंबर ३, २०२६: ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या सीएसआर शाखेने आज संपूर्ण भारतातील सर्जनशील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी ६० लाख रुपये मूल्याची अनुदाने उपलब्ध करून देत आपल्या प्रमुख आर्ट फॉर होप उपक्रमाचा सीझन ६ सुरू करण्याची घोषणा केली.
‘इंडिया इन मोशन’ संकल्पनेवर आधारित सीझन ६ कलाकार, कारागीर, कला समूह आणि सर्जनशील व्यावसायिकांना अर्ज करण्याचे आवाहन करते, ज्यामुळे वेगाने प्रगती करणारा भारत कलेच्या माध्यमातून नवीन विचार, ओळख आणि शक्यता कशा प्रकारे निर्माण करत आहे याचा शोध घेता येईल. निवडक लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य, मार्गदर्शन, राष्ट्रीय ओळख आणि आर्ट फॉर होप फेस्टिव्हलमध्ये आपले काम प्रदर्शित करण्याची संधी दिली जाईल.
आर्ट फॉर होप – सीझन ६ च्या शुभारंभाबाबत मत व्यक्त करत एचएमआयएलचे एमडी आणि सीईओ श्री. तरुण गर्ग म्हणाले,
“ह्युंडाईमध्ये आमचा जागतिक दृष्टीकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ केवळ मोबिलिटीपुरता मर्यादित नसून व्यक्ती आणि समाजाला सक्षम करणाऱ्या संधी निर्माण करण्यावर भर देतो. ‘आर्ट फॉर होप’च्या माध्यमातून आम्ही २.२० कोटी रुपये मूल्यापेक्षा जास्त रकमेची अनुदाने दिली आहेत, भारतभरातील २०० हून अधिक कलाकारांना पाठबळ दिले आहे आणि ७५ हून अधिक पारंपारिक व लोककला प्रकारांचे जतन करण्यास मदत केली आहे. सीझन ६ मध्ये एकूण ६० लाख रुपये मूल्याची अनुदाने देऊन आम्ही वेगाने बदलणाऱ्या भारताच्या महत्त्वाकांक्षा, विविधता आणि गतीचे प्रतिबिंब मांडणाऱ्या सर्जनशील आवाजांना बळ देण्यास उत्सुक आहोत. विश्वास, अभिमान आणि प्रगती या मूल्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक समावेशन, सर्जनशीलता आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
आपल्या स्थापनेपासून आर्ट फॉर होपने २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपला विस्तार केला आहे, तसेच कलाकार, कारागीर आणि सर्जनशील समुदायांना व्यापक प्रेक्षकवर्गाशी जोडणारा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. याच्या वार्षिक महोत्सवांनी ३५,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांचे स्वागत केले आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ६१ टक्के प्रेक्षकांचा समावेश आहे. तसेच १०० हून अधिक कारागीर व एनजीओ स्टॉल्सना पाठबळ देत, उपजीविकेच्या संधी निर्माण केल्या आहेत आणि तळागाळातील सर्जनशील टॅलेंटला ओळख मिळवून दिली आहे.
आर्ट फॉर होप सीझन ६ मधील श्रेणी आणि संधी कोणत्या आहेत?
पुढील सहा श्रेणींमध्ये अर्ज मागवले जात आहेत:
§ व्हिज्युअल आर्ट (दृश्यकला)
§ डिजिटल आर्ट
§ परफॉर्मिंग आर्ट (सादरीकरण कला)
§ पारंपारिक कला आणि हस्तकला (ट्रॅडिशनल आर्ट अँड क्राफ्ट)
§ फंक्शनल आर्ट
§ बहुविद्याशाखीय प्रकल्प (मल्टीडिसिप्लिनरी प्रोजेक्ट्स)
आर्ट फॉर होप – सीझन ६ मध्ये कसे सहभागी व्हावे?
आर्ट फॉर होप – सीझन ६ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ आहे.
इच्छुक सहभागी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात: hyundaiartforhope.com
सीझन ६ ची संकल्पना – ‘इंडिया इन मोशन’ काय दर्शवते?
§ ‘इंडिया इन मोशन’ हे प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर असलेल्या देशाच्या भावनेचे प्रतिबिंब आहे, जिथे व्यक्ती, विचार, समुदाय आणि संस्कृती सातत्याने नव्या शक्यतांना आकार देत आहेत.
§ ही संकल्पना प्रगती, महत्त्वाकांक्षा, नाविन्यता आणि समावेशन कशा प्रकारे शहरी व ग्रामीण भारतातील जीवनावर प्रभाव पाडत आहेत याचा शोध घेण्यासाठी कलाकारांना प्रेरित करते.
§ सीझन ६ उपक्रमाचा ‘आर्ट विदाउट बॅरियर्स’ (बंधनांशिवाय कला) दृष्टिकोन कायम ठेवेल, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसह वंचित आणि दुर्लक्षित घटकांमधील सहभागास प्रोत्साहन दिले जाईल.
आर्ट फॉर होपच्या माध्यमातून एचएमआयएफ महिला, ग्रामीण कारागीर, पारंपारिक व लोककलाकार, वंचित घटक आणि दिव्यांग व्यक्तींसह उदयोन्मुख व दुर्लक्षित सर्जनशील आवाजांसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करणे सुरू ठेवत आहे. केवळ आर्थिक अनुदानापलीकडे जाऊन हा उपक्रम मार्गदर्शन, राष्ट्रीय ओळख आणि सर्जनशील काम प्रदर्शित करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो, तसेच कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक संवर्धन, स
मावेशन आणि सामाजिक विकासाला गती देतो.


