Tuesday, November 3, 2026
Google search engine
HomeUncategorized*मेट्रो-3 वरील पहिल्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थिनी, आयटीएन्सशी संवाद* ...

*मेट्रो-3 वरील पहिल्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थिनी, आयटीएन्सशी संवाद* *नव्या मार्गावर पहिले तिकीट घेऊन केला प्रवास*

 

 

पुणे, दि. ३ : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन आणि पुणे मेट्रो फेज-2 च्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी ते हिंजवडी फेज -2 असा मेट्रोतून प्रवास केला. या नव्या मार्गावरील पहिले तिकीट मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वतः घेऊन मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला.

 

यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग, स्थानके आणि प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली.

 

या प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

 

या प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे पिंक मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटकडे होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षम सहभागातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या योगदानाचे दर्शन यानिमित्ताने घडले.

 

प्रवासादरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शाळकरी विद्यार्थिनी, आयटीएन्स यांच्याशी संवाद साधला. मेट्रो प्रवासाचा अनुभव, उपलब्ध सुविधा आणि नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासात होणारे फायदे याविषयी त्यांनी जाणून घेतले. मुख्यमंत्री व मान्यवरांनी हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकापर्यंत सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास केला.

 

महिला ट्रेन पायलटच्या नेतृत्वाखाली झालेला हा प्रवास आणि विद्यार्थिनींसह विविध क्षेत्रांतील नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी साधलेला संवाद यामुळे नव्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतरचा हा प्रवास विशेष ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments