पुणे : डी बीयर्स ग्रुपच्या फॉरएव्हरमार्क डायमंड ज्वेलरीने फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स येथे आपले पहिले बुटीक सुरू करून पुण्यात प्रवेश केला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे नवे बुटीक नैसर्गिक हिरे, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि उत्कृष्ट कारागिरी असलेले फॉरएव्हरमार्क डायमंड ज्वेलरीचे विश्व शहराच्या बदलत्या फाइन ज्वेलरी बाजारपेठेत घेऊन आले आहे.
बुटीकमध्ये फॉरएव्हरमार्क डायमंड ज्वेलरीची आयकॉन, अवांती आणि मिलीमोई यांसारखी काही सिग्नेचर कलेक्शन्स, तसेच सॉलिटेअर, ब्रायडल ज्वेलरी, खास प्रसंगांसाठीचे दागिने आणि रोजच्या वापराचे डिझाइन्स उपलब्ध आहेत. समकालीन आणि चिरंतन सौंदर्याचा मेळ साधणारी ही कलेक्शन्स नैसर्गिक हिऱ्यांचे सौंदर्य आणि दुर्मीळता यांना विचारपूर्वक केलेल्या डिझाइन आणि कारागिरीची जोड देण्याच्या ब्रँडच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहेत.
या लॉन्चबद्दल बोलताना डी बीयर्स इंडिया प्रा. लि.च्या फॉरएव्हरमार्कचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन रेड्डी यराबोलू म्हणाले, “पुणे ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील चोखंदळ आणि बदलत्या अभिरुचीचा ग्राहकवर्ग दर्जा, डिझाइन आणि कारागिरीची कदर करतो. पुण्यातील आमचे पहिले आणि पश्चिम विभागातील चौथे बुटीक सुरू होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे, कारण आम्ही देशभरात आमचे रिटेल अस्तित्व सातत्याने बळकट करत आहोत..”
पहिल्या वर्धापनदिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून पुणे बुटीकला भेट देणाऱ्या ग्राहकांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत स्टोअरमध्ये केलेल्या पात्र खरेदीवर ₹15,00,000 पर्यंतचे खास फर्स्ट-इयर प्रिव्हिलेजेस मिळू शकतील. ही ऑफर लागू अटी व शर्तींच्या अधीन आहे.
नव्या बुटीकमुळे भारतात फॉरएव्हरमार्क डायमंड ज्वेलरीचे वाढते रिटेल अस्तित्व अधिक भक्कम झाले आहे. रोजच्या क्षणांपासून आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांपर्यंत नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने शोधणाऱ्या अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ब्रँडची कलेक्शन्स आणि वैशिष्ट्यपूर्ण रिटेल अनुभव यामुळे पोहोचणार आहेत.


