पुणे –
शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘युथ’, ‘ज्युनिअर’ आणि ‘सीनिअर’ राज्य अजिंक्यपद जिम्नॅस्टिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘इन्फिनिटी जिम्नॅस्टिक्स क्लब’ने ४३ सुवर्ण, ३३ रौप्य आणि २० कांस्य पदके जिंकली तसेच सहा सांघिक विजेतेपद पटकावित निर्विवाद वर्चस्व गाजविले.
ही स्पर्धा ‘महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन’द्वारे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ‘इन्फिनिटी जिम्नॅस्टिक्स क्लब’च्या ३२ खेळाडूंनी भाग घेतला होता.
स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे आहेत:
ज्युनिअर मुले
१. निषाद नरवणे ‘ऑल-राऊंड चॅम्पियन’ ठरला! त्याने फ्लोअर, पॉमेल हॉर्स, रिंग्ज, व्हॉल्ट आणि हाय बार या प्रकारांत सुवर्ण पदके जिंकली. एकूण: ७ सुवर्ण पदके.
२. प्रसून अमळनेरकर ‘ऑल-राऊंड’ स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने फ्लोर, पॉमेल हॉर्स, रिंग्ज आणि हाय बारमध्ये रौप्य पदके, तर व्हॉल्ट प्रकारात कांस्य पदक जिंकले. एकूण: ५ रौप्य आणि १ कांस्य पदक.
निषाद नरवणे, श्लोक भुतकर, हर्षवर्धन नलावडे, आयुष दळवी आणि प्रसून अमळनेरकर यांचा समावेश असलेल्या पुणे संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि ट्रॉफी जिंकली!
वरीष्ठ मुले
अनय किर्लोस्कर ‘ऑल-राऊंड’ स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने रिंग्ज प्रकारात रौप्य आणि हाय बार प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. एकूण: १ सुवर्ण, ३ रौप्य पदके.
कौस्तुभ अहिरे याने पॉमेल हॉर्स प्रकारात कांस्य पदक जिंकले. एकूण: १ रौप्य, १ कांस्य पदक.
अनय किर्लोस्कर आणि कौस्तुभ अहिरे यांचा समावेश असलेल्या पुणे संघाने रौप्य पदक आणि ट्रॉफी जिंकली.
वरीष्ठ मुली
१. शताक्षी टक्के ‘ऑल-राऊंड’ स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तिने फ्लोअर प्रकारात कांस्य आणि बीम प्रकारात रौप्य पदक जिंकले. एकूण: २ रौप्य, १ कांस्य आणि १ सुवर्ण पदक.
२. उर्वी वाघ हिने बीम प्रकारात सुवर्ण आणि बार्स प्रकारात कांस्य पदक जिंकले. एकूण: २ सुवर्ण, १ कांस्य
३. सारा राऊल ‘ऑल राऊंड’ (सर्व प्रकारांत मिळून) तिसऱ्या क्रमांकावर राहिली आणि तिने ‘फ्लोअर’ प्रकारात रौप्य पदक जिंकले. एकूण: १ रौप्य, १ कांस्य
४. अनन्या शेट्टी ‘ऑल राऊंड’मध्ये पाचव्या क्रमांकावर राहिली आणि तिने ‘व्हॉल्ट’ प्रकारात कांस्य पदक जिंकले. एकूण: १ कांस्य, १ सुवर्ण
५. अनन्या शेट्टी, शतक्षी टक्के, हर्षिता काकडे, उर्वी वाघ आणि तिथी टिळेकर यांचा समावेश असलेल्या पुणे संघाने प्रथम क्रमांक पटकावून ट्रॉफी जिंकली.
ज्युनियर मुली:
मरीशा भोईर हिने ‘टेबल व्हॉल्ट’ आणि ‘अनइव्हन बार्स’ प्रकारात कांस्य पदके जिंकली.
युथ चॅम्पियनशिप्स:
लेव्हल ८ – वयोगटातील मुले:
श्रीहान वाळिंबे ‘ऑल राऊंड’ चॅम्पियन ठरला. त्याने ‘पॉमल हॉर्स’, ‘स्टिल रिंग्ज’, ‘टेबल व्हॉल्ट’ आणि ‘हाय बार’ प्रकारांत सुवर्ण पदके, तर ‘पॅरलल बार्स’ प्रकारात कांस्य पदक जिंकले.
लेव्हल ८ – ओपन वयोगट (मुले):
विवान जोशी ‘ऑल राऊंड’मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने ‘फ्लोअर एक्सरसाइज’मध्ये दुसरे, ‘पॉमल हॉर्स’मध्ये पहिले, ‘स्टिल रिंग्ज’मध्ये तिसरे, ‘पॅरलल बार्स’ मध्ये पहिले आणि ‘हाय बार’मध्ये दुसरे स्थान मिळवले.
लेव्हल ९ – वयोगटातील मुले:
हरीत भट्ट ‘ऑल राऊंड’मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला – त्याने ‘फ्लोअर एक्सरसाइज’मध्ये दुसरे, ‘पॅरलल बार्स’ मध्ये पहिले आणि ‘हाय बार’मध्ये पहिले स्थान मिळवले. स्वराज बराटे – ‘ऑल राऊंड’ (सर्वसाधारण) गटात द्वितीय; ‘फ्लोअर एक्सरसाइज’मध्ये प्रथम, ‘पॉमल हॉर्स’मध्ये द्वितीय, ‘स्टिल रिंग्ज’मध्ये तृतीय आणि ‘टेबल व्हॉल्ट’मध्ये तृतीय क्रमांक.
लेव्हल ९ – ओपन एज (वयोगट खुला) मुले:
हर्षवर्धन नलावडे – ‘स्टिल रिंग्ज’मध्ये प्रथम, ‘टेबल व्हॉल्ट’मध्ये द्वितीय क्रमांक.
श्लोक भुतकर – ‘फ्लोर एक्सरसाइज’मध्ये तृतीय, ‘पॉमल हॉर्स’मध्ये द्वितीय क्रमांक.
आदेश वाघचौडे – ‘ऑल राऊंड’ गटात द्वितीय; ‘फ्लोर एक्सरसाइज’मध्ये द्वितीय, ‘पॉमल हॉर्स’मध्ये प्रथम, ‘स्टिल रिंग्ज’मध्ये तृतीय, ‘पॅरलल बार्स’ (PB) मध्ये द्वितीय आणि ‘हाय बार’मध्ये तृतीय क्रमांक.
लेव्हल ८ – वयोगटांतर्गत मुली:
उर्वी जरांडे हिने ‘व्हॉल्ट’ प्रकारात कांस्य पदक पटकावले.
लेव्हल ९ – वयोगटांतर्गत मुली:
ईश्वरी शिंदे हिने ‘अनइव्हन बार्स’ प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.
लेव्हल ९ – ओपन एज (वयोगट खुला) मुली:
मरीशा भोईर ‘ऑल राऊंड’ चॅम्पियन ठरली. तिने ‘व्हॉल्ट’ आणि ‘अनइव्हन बार्स’ प्रकारात सुवर्ण, ‘फ्लोर एक्सरसाइज’मध्ये रौप्य आणि ‘बीम’ प्रकारात कांस्य पदक मिळवले.
या खेळाडूंना श्री अजित जरांडे , मानसी शेवडे, अभिषेक मोरे व प्रवीण भैरवकर, यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच आहारसंबंधीचे मार्गदर्शन डॉक्टर आरती दीक्षित – लिमये यांच्या कडून मिळाले.


