Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedशास्त्रीय उपशास्त्रीय संगीताने रंगली संगीत मैफल श्री जंगली महाराज देवस्थान...

शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताने रंगली संगीत मैफल श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव ; विदुषी सानिया पाटणकर यांची गायन सेवा

पुणे : ‘कानन कुंडल बहुजन पालक श्री ओंकार’ अशा यमन रागातील खयाल, ‘सखी आज तेरी पिया विन याद आये’ असे विरह गीत, ‘जब से पिया परदेस गमन किया’ अशा प्रकारचे भावपूर्ण गीत यांसह विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन करणारे अभंग अशा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय प्रकारच्या सादरीकरणाने सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात विदुषी सानिया पाटणकर यांची संगीतमय मैफल रंगली.

 

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात सानिया पाटणकर यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

‘मेरे जोगी’ या बंदिशीने तसेच ‘सखी पिया की याद आये’ या सरगमने सानिया पाटणकर यांनी संगीत मैफिलीची सुरुवात केली. विविध प्रकारच्या ताना, ठुमरी आणि रागाने सजलेल्या त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या स्वरूपात दाद दिली. ‘सखी आज तेरी पिया विन याद आये’, ‘जब से पिया परदेस गमन किया’ यांसह यमन रागातील विविध प्रकारच्या गाण्यांनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 

त्यानंतर त्यांनी ‘रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’, ‘विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा’ अशा विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणाऱ्या गीतांनी संगीत मैफल सजवली. उत्तर भारतामध्ये सादर करण्यात येणाऱ्या होळी हा संगीत प्रकार त्यांनी ‘सकल ब्रिज धूम मचाये रे’ हे राधा कृष्णाचे प्रेम संगीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. माधव लिमये ( हार्मोनियम), कार्तिक स्वामी ( तबला) तसेच अपूर्वा देशपांडे, अद्वया आपटे, नितीन महाबळेश्वरकर आणि मुकुंद जोशी यांनी गायनामध्ये साथ संगत केली

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments