Friday, November 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे शहरात आयोजन ...

कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे शहरात आयोजन  स्पर्धेत 100हुन अधिक खेळाडू सहभागी

 

 

नांदेड, 13 नोव्हेंबर 2026: कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे शहरात एनईएस सायन्स कॉलेज येथे 14 ते 19 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी शहर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने शहरात दुसऱ्या वर्षी वरिष्ठ आयटीएफ टेनिस स्पर्धेत आयोजन होत असून ही स्पर्धा आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत आहे. या स्पर्धेला कोहिनुर ग्रुप यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

 

स्पर्धेत देशभरातून 100 हुन खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा 35 वर्षांवरील, 40 वर्षांवरील, 45वर्षांवरील, 55वर्षांवरील, 60 वर्षांवरील, 65 वर्षांवरील, 70 वर्षांवरील, 75वर्षांवरील, 80 वर्षांवरील, 85 वर्षावरील, 90वर्षांवरील पुरुष गटात, तर 35 वर्षांवरील, 40 वर्षांवरील, 45वर्षांवरील, 55वर्षांवरील, 60 वर्षांवरील, 65 वर्षांवरील, 70 वर्षांवरील, 75वर्षांवरील महिला गटात पार पडणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक डीएस रामा राव यांनी दिली.

 

स्पर्धेत यती गुजराती, संजय कुमार, मोहित सोरडे, गौरव राव, गौरबदीप घोष, राम कुमार चौधरी, स्वरणदीप सिंग धोडी, जतिंदर गंभीर, निलेश चांडक हे नामांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले(आयएएस), नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक नीलभ रोहन, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, नांदेड एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील आणि नांदेड क्लबचे सचिव मनीष डोईफोडे यांच्या हस्ते होणार असल्याचे एमएसएलटीए कार्यकारी समितीचे सदस्य अली मोहम्मद पंजवानी यांनी नमूद केले.

 

या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आयटीएफ गुण मिळवण्याची व आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, या स्पर्धेत भारतातील अनेक अव्वल माजी टेनिसपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या वरिष्ठ गटातील स्पर्धांमुळे देशातील टेनिसच्या प्रसारासाठी आणखी मदत मिळणार असून अनेक भागातील वरिष्ठ टेनिसपटूंना पुन्हा टेनिसकडे वळण्याची तसेच, व्यावसायिक टेनिसखेळाडूंना उच्च स्तरावरील स्पर्धा करण्याची आणि आपल्या खेळात व तंदरुस्ती यामध्ये सातत्य राखण्यासाठी मदत मिळणार असल्याचे स्पर्धा संचालक हरजिंदर सिंग चिरगाला सांगितले.

 

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: पुरुष एकेरी

30 वर्षांवरील: 1. मोहित सोरडे, 2. गौरव राव, 3. अमित देशमुख, 4. सनत मेहरा;

35 वर्षांवरील: 1. गौरबदीप घोष, 2. गौरव बांग, 3. अनिकेत पावडे, 4. विनीत तेहरा;

40 वर्षांवरील: 1. राम कुमार चौधरी, 2. जयनारायण केआर, 3. यती गुजराती, 4. प्रितेश निंबाळकर;

45 वर्षांवरील: 1. स्वरणदीप सिंग धोडी, 2. नीलेश चांडक, 3. अरविंद नारला, 4. संदीप पाटील;

50 वर्षांवरील: 1. जतिंदर गंभीर, 2. मनीष शिराळकर, 3. भूपिंदर कुमार, 4. चारुदत्त ओझरकर;

55 वर्षांवरील: 1. इलामुरुगु अय्यासामी, 2. धरमवीर सिंग, 3. जितेंद्र जोशी, 4. केतन बेडेकर;

60 वर्षांवरील: 1. संजय कुमार, 2. एस.एन. वशिष्ठ, 3. सुशील कोगटा, 4. एकनाथराव

घोडेकर;

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments