दिवाळीनंतर काही आठवडे हळूहळू पुन्हा नेहमीच्या दिनचर्येकडे परतण्याचे असतात. या काळात वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या सणासुदीपूर्वी ग्राहक आपल्या फिटनेसच्या वेळापत्रकावर, जेवणाच्या निश्चित वेळेवर आणि अधिक सजग आहार सवयींवर पुन्हा लक्ष केंद्रित करत असतात. दैनंदिन आरोग्यावरील या नवीन लक्षामुळे संतुलित आहाराला पुन्हा प्राधान्य दिले जात, ज्यामध्ये पोषण, चव आणि सोयीस्करपणा या तिन्ही गोष्टींना समान महत्त्व दिले जाते. पण, व्यस्त वेळापत्रकामुळे कुकिंगसाठी फारसा वेळ मिळत नसल्याने संतुलित आहार घेण्याचे व्यावहारिक मार्ग शोधणे आवश्यक बनले आहे.
गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट २०२६ (जीएफटीआर २०२६) मध्ये “घरगुती कुकिंगचा इंटेलिजंटली विकास होईल” ट्रेंडच्या माध्यमातून हा बदलता दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. भारतातील आधुनिक किचनमध्ये सोयीस्करपणा अविभाज्य भाग बनत आहे, हे यातून अधोरेखित होते. रेडी-टू-कूक पदार्थ आणि इतर सोयीस्कर अन्न पर्याय जेवण बनवण्याची प्रक्रिया सुलभ करत आहेत, ज्यामुळे ग्राहकांना घरगुती जेवणाचा आपलेपणा आणि समाधान कायम ठेवता येते.
संतुलित आहार तयार करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रथिनांच्या (प्रोटीन) योग्य स्रोतांचा समावेश करणे. विशेषतः पुन्हा फिटनेस रुटीनकडे वळत असलेल्या व्यक्तींसाठी प्रथिने स्नायूंच्या दुरुस्ती आणि पुनर्प्राप्तीमध्ये (रिकव्हरी) महत्त्वाची भूमिका बजावतात, तसेच दैनंदिन पौष्टिक गरजाही पूर्ण करतात. प्रथिनांचा समावेश केवळ व्यायामानंतर वेळेपुरता मर्यादित न ठेवता दिवसभरातील विविध जेवणांमध्ये करता येऊ शकतो.
गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या न्यूट्रिशनल कंसल्टंट आणि गोदरेज फूड्स लिमिटेड व गोदरेज जर्सीच्या हेल्थ कम्युनिकेशन्स अॅडवायजरी डॉ. मनिका सिंग म्हणाल्या, “आरोग्यदायी आहार स्वीकारण्यासाठी गुंतागुंतीच्या आहार नियोजनाची किंवा प्रस्थापित आहार सवयींमध्ये मोठ्या बदलांची आवश्यकता नसते. पुरेशी प्रथिने, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांसारख्या विविध अन्नगटांचा समावेश असलेला संतुलित आहार तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. विशेषतः सक्रिय जीवनशैली असलेल्या व्यक्तींसाठी प्रथिने या संतुलनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे स्नायूंची झीज भरून निघण्यास मदत होते. सध्या विविध प्रकारचे अन्न पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहक व्यस्त वेळापत्रक असूनही योग्य निर्णय घेण्यास आणि आपल्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्याचे प्रभावी मार्ग शोधण्यास सक्षम आहेत.”
सोयीस्कर अन्न पर्यायांमुळे हे पौष्टिक निर्णय रोजच्या जेवणात प्रत्यक्षात आणणे अधिक सोपे होऊ शकते. शेफ राखी वासवानी म्हणाल्या, “संतुलित आहार घेण्याचा अर्थ नेहमी किचनमध्ये जास्त वेळ घालवणे असा होत नाही. थोड्या विचारपूर्वक केलेल्या बदलांमुळे नेहमीचे घटक वापरून चविष्ट आणि समाधानकारक जेवण तयार करता येते. उदाहरणार्थ, १८ ग्रॅम प्रथिने देणारे गोदरेज यमीझ चिकन सॉसेजेस वापरून एकाच पॅनमध्ये झटपट सॉसेज आणि अंड्याचा आहार तयार करता येतो, तर १६ ग्रॅम प्रथिने असलेले चिकन नगेट्स भाज्या आणि इतर पदार्थांसह पौष्टिक रॅपमध्ये रूपांतरित करता येतात. व्यायामानंतर असो किंवा दोन जेवणांच्या मध्ये भूक लागल्यावर असो, व्यस्त दिवशी कुकिंगचे ओझे न वाटता रोजच्या जेवणात वैविध्य आणण्याचे हे सोपे मार्ग आहेत.”
ग्राहक त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकाकडे परतत आहेत, तेव्हा संतुलित आहार घेण्याचा संकल्प आणि दैनंदिन कुकिंगमधील प्रत्यक्ष आव्हाने यांतील तफावत दूर करण्यासाठी सोयीस्कर अन्नपर्याय मदत करू शकतात. पोषण, चव आणि तयार करण्यातील सहजता यांचा संगम साधून हे पर्याय संतुलित आहाराला दैनंदिन जीवनाचा अधिक सुसह्य भाग बनवण्याचा व्यावहारिक मार्ग देतात.


