नांदेड, 14 नोव्हेंबर 2026: नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी शहर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कोहिनुर-एनईएस एमटी 200 जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विनीत तेहरा याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
एनईएस सायन्स कॉलेज येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 35 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत विनीत तेहराने दुसऱ्या मानांकित हर्ष तलाजियाचा 6-4, 6-4 असा तर, शशांक बोमनाळेने गौरव बांगचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. 30 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित गौरव रावने सनत मेहराचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.
40 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत गणेश देवखिलेने तन्मय पंडितवर 6-1, 6-1 असा विजय मिळवला. 45 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत स्वामी राधारपूचे आव्हान 6-0, 6-1 असे मोड़ीत काढले. पराग अत्रेने गुरु नंदन सिंगला 6-1, 6-0 असे नमविले. याआधी स्पर्धेचे उदघाटन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले(आयएएस), नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक नीलभ रोहन, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, नांदेड एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील आणि नांदेड क्लबचे सचिव मनीष डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक डीएस रामा राव, एमएसएलटीए कार्यकारी समितीचे सदस्य अली मोहम्मद पंजवानी, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी उपस्थित होते.
निकाल: 30 वर्षांवरील पुरुष:उपांत्य फेरी:
मोहित सोरडे(भारत)[1] पुढे चाल वि.शोएल अली (भारत)
गौरव राव(भारत)[2] वि.वि.सनत मेहरा(भारत)6-0, 6-0;
35 वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
विनीत तेहरा(भारत)वि.वि.हर्ष तलाजिया(भारत)[2]6-4, 6-4;
शशांक बोमनाळे(भारत)वि.वि.गौरव बांग(भारत)6-4, 6-2;
40 वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
गणेश देवखिले(भारत)वि.वि.तन्मय पंडित(भारत) 6-1, 6-1;
45 वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
स्वरणदीप सिंग धोडी(भारत)[1] वि.वि.स्वामी राधारपू(भारत)6-0, 6-1;
पराग अत्रे (भारत)वि.वि.गुरु नंदन सिंग (भारत
)6-1, 6-0;


