पुणे- दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणे शहरातील एसटीपी प्लांट मध्ये शुद्ध केलेल्या ६०० एम एल डी पाण्याचे नीट नियोजन करून त्या पाण्याचा पुनर्वापर करणेबाबत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी पाठवले आहे. या निवेदनात म्हटले आहे की
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरसाहेब यांनी देशाचे अर्थमंत्री कै.अरुण जेटलीसाहेब यांच्याकडून पुणे महानगरपालिकेसाठी jica प्रकल्प मंजूर करून आणला…
ज्या प्रकल्पावर आत्तापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या वर खर्च झाला आहे….
या प्रकल्पात सध्या १११ एम एल डी म्हणजे अकरा कोटी दहा लाख लिटर पाणी शुद्ध करून पुन्हा नदीतील अशुद्ध पाण्यामध्ये
सोडले जात आहे ..
पुणे शहरात एकूण ६०० एमएलडी पाणी ट्रिट करून शुद्ध केले जाते त्या शुद्ध केलेल्या पाण्याचा पुनर्वापर होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक एसटीपी प्लांट मधील शुद्ध केलेले पाणी टँकरद्वारे शहरातील उद्याने व नवीन बांधकामांना वापरणे बंधनकारक करावे
शहरातील मोठमोठ्या शंभर फ्लॅटच्या वरील सोसायटीतील एसटीपी प्लांट चालू आहेत का नाही हे चेक करणे महापालिकेचे काम आहे
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे महापालिकेचा क्रमांक बारावर जाण्याचं कारणही हेच आहे एसटीपी प्लांट मधील शुद्ध केलेल्या पाण्याचा पुनर्वापर कसा करतात याचे रेकॉर्डच नाही कारण शुद्ध केलेले पाणी परत नदी मधील अशुद्ध पाण्यात सोडले जाते
आपण याबाबत एमपीसीबी कडून अहवाल मागवावा….
आमचा आजचा मुद्दा चौकशीत कोण दोषी काय झाले हा नसून दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये बांधकाम व्यवसाय देखील टिकला पाहिजे शेतकरी देखील टिकला पाहिजे पण पिण्याचे पाणी देखील टिकले पाहिजे हा आहे…
यासाठी या ११ कोटी १० लाख लिटर प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी योग्य ते तांत्रिक पर्याय तातडीने उभे करून शहरातील उद्यानांसाठी, बांधकामासाठी वापरण्याची सक्ती करावी..
नको त्या कामाला गरज नसताना कलम 67(3) C याचा वापर महानगरपालिका करते.. गरज नसताना सल्लागार नेमते…
आत्ता या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन… तातडीने या एसटीपी प्लांटवर उद्यानांसाठी, बांधकामासाठी टँकर पॉइंटची निर्मिती करणे आवश्यक आहे तशा सूचना आणि आदेश आपण पुणे महानगरपालिकेला द्यावेत….
याचा सर्व तपशील याचा एक अहवाल आम्ही तयार केला आहे तोही आपल्याला देत आहोत..
शुद्ध केलेलं पाणी पुन्हा अशुद्ध करायचं हे योग्य नाही महानगरपालिकेची यंत्रणा नाही त्या खात्यामध्ये १७,१७ वर्ष एक एक अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत…
अनेक लोकप्रतिनिधी नवीन आहेत…
अधिकारी जुने आहेत अनेक अधिकारी तर बाहेरून इथं आलेले आहेत त्यांना इथल्या कुठल्याच गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही….
आपण दौंडच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुण्यामध्ये आला आहात म्हणून हा विषय आपल्याकडे आम्ही सादर करत आहोत आपण योग्य ते आदेश प्रशासनाला द्याल याची आम्हाला खात्री आहे म्हणून हा विषय आपल्यासमोर मांडत आहोत.


