Tuesday, November 17, 2026
Google search engine
HomeUncategorized१ जानेवारी २०२७ च्या जयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमाचा प्रशासनाकडून आढावा* ...

१ जानेवारी २०२७ च्या जयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमाचा प्रशासनाकडून आढावा* *विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे सूक्ष्म नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

 

 

पुणे, दि. १७ : ऐतिहासिक जयस्तंभ अभिवादन सोहळा अर्थात शौर्यदिन १ जानेवारी २०२७ रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज आढावा बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस उपायुक्त अविनाशकुमार, बार्टीच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे उपस्थित होते.

 

शौर्यदिनाचा कार्यक्रम सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाला सोपविण्यात आलेली जबाबदारी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी. आवश्यक कामांच्या निविदा प्रक्रिया नियमानुसार विहित कालमर्यादेत पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

 

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य विभाग आणि अन्य संबंधित विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनुयायांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था निर्माण करावी. विद्युत विभागाने अखंडित वीजपुरवठा आणि आवश्यक प्रकाशव्यवस्थेचे नियोजन करावे.

 

पीएमपीएमएलने मागील वर्षाप्रमाणे यंदाही अनुयायांच्या वाहतुकीसाठी पुरेशा बसगाड्यांची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य सुविधा, वैद्यकीय पथके, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि परिसरातील स्वच्छता याबाबतही काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

 

कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. नियोजनातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी विभागप्रमुखांनी नियमित समन्वय ठेवावा. कामांच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषदेसह विविध विभागांनी शौर्यदिनाच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाची माहिती सादर केली.

 

यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments