Wednesday, November 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा ऑटोकॉम्पने तीन वर्षांत आपला चौथा डेमिंग पुरस्कार पटकावला

टाटा ऑटोकॉम्पने तीन वर्षांत आपला चौथा डेमिंग पुरस्कार पटकावला

पुणे, १८ नोव्हेंबर २०२६: गुणवत्तेप्रती असलेल्या कटिबद्धतेमुळे टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्सने आणखी एक जागतिक टप्पा गाठला आहे. प्रतिष्ठित ‘डेमिंग पुरस्कार’ मिळवणारी टाटा टोयो रेडिएटर्स लिमिटेड (टीटीआर) ही भारतातील पहिली पॉवरट्रेन कूलिंग सिस्टम्स डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ठरली आहे. ‘युनियन ऑफ जापनीज सायंटिस्ट्स अँड इंजिनियर्स’ (जेयूएसई) तर्फे दिला जाणारा डेमिंग पुरस्कार ‘टोटल क्वालिटी मॅनेजमेंट’ (टीक्यूएम) आणि सातत्यपूर्ण सुधारणा या क्षेत्रातील जगातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो.

 

 

नुकताच मिळालेला हा सन्मान म्हणजे गेल्या तीन वर्षांतील टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्सचा चौथा डेमिंग पुरस्कार आहे. यामुळे उत्पादनातील उत्कृष्टता आणि सातत्यपूर्ण सुधारणांप्रती कंपनीची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. यापूर्वी २०२५ मध्ये टाटा ऑटोकॉम्प हेंड्रिकसन सस्पेंशन्स प्रायव्हेट लिमिटेडला (टीएचएसएल) हा पुरस्कार मिळाला होता, तर २०२४ मध्ये टाटा फिकोसा ऑटोमोटिव्ह सिस्टम्स प्रा. लि. आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्सच्या कंपोझिट्स डिव्हिजनला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या यशामुळे जागतिक दर्जाच्या गुणवत्ता निकषांप्रती समूहाची असलेली सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित होते.

 

 

 

या भव्य यशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडचे व्हाईस-चेअरमन श्री. अरविंद गोयल म्हणाले, “२०१८ मध्ये आमचा ‘टोटल क्वालिटी मॅनेजमेंट’ (टीक्यूएम) प्रवास सुरू झाल्यापासून टाटा ऑटोकॉम्पच्या चार बिझनेस युनिट्सनी प्रतिष्ठित डेमिंग पुरस्कार जिंकला आहे, ज्यामध्ये टाटा टोयो रेडिएटर्स हे सर्वात नवीन नाव आहे. गुणवत्तेची संस्कृतीच शाश्वत यशाचा पाया रचते, यावर यातून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे. संपूर्ण संस्थेमध्ये टीक्यूएम संस्कृती रुजवत असतानाच आम्ही आमच्या ‘टियर ०.५’ क्षमता देखील बळकट करत आहोत. यामुळे ओईएम कंपन्यांशी अधिक चांगला समन्वय साधून आधुनिक प्रणाली-आधारित उपाय उपलब्ध करून देणे शक्य होत आहे. परिणामी, आमच्या ग्राहकांसाठी उत्पादनांची वेगवान उपलब्धता, कमीत कमी कालावधीत विकास आणि अधिक विश्वासार्हता सुनिश्चित होत आहे.”

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments