Wednesday, November 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजा शिवछत्रपती' भव्य रंगावली प्रदर्शनातून उलगडणार शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग सरस्वती आर्ट ९...

राजा शिवछत्रपती’ भव्य रंगावली प्रदर्शनातून उलगडणार शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग सरस्वती आर्ट ९ – शारदा अवसरे आणि सहकलाकार यांच्या वतीने २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगावली प्रदर्शन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि ऐतिहासिक कार्याचा कलात्मक आविष्कार रंगावलीच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. शारदा अवसरे आणि सहकलाकार यांच्या वतीने ‘राजा शिव छत्रपती’ या भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हे प्रदर्शन होणार आहे.

 

दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन पाहता येणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन, पुणे तर्फे प्रा. अक्षय शहापूरकर यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन लाभले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवजयंती महोत्सव समिती, पुणेचे प्रवर्तक व संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच रंगावलीकार अक्षय शहापूरकर आणि अनिल निवृत्ती पवार यांची उपस्थिती असणार आहे.

 

प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नाशिक येथील राजेश पाटील यांचे फलक रेखाटन होणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अक्षय शहापूरकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होईल. तर २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भूषण शिंदे व सहकलाकारांचे बासरी वादन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य रंगावलीच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी आणि कलाकारांच्या कलेचा अनुभव घेण्यासाठी पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments