Friday, November 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे महानगरपालिका - अतिक्रमण विरोधी मोहीम*पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचे...

पुणे महानगरपालिका – अतिक्रमण विरोधी मोहीम*पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुणे शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन.

 

*पुणे महानगरपालिका – अतिक्रमण विरोधी मोहीम*

++++++++++++

 

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचे. आणि शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन.माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केले आहे.

 

अतिक्रमण विरोधी भूमिका सभागृहात घेतली. आयुक्त आणि प्रशासनाने चांगला प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही सुरू केली. ही कार्यवाही निरंतर चालणार आहे. सध्या दोन महिने सुट्टीच्या दिवशी देखील कार्यवाही होणार आहे.

 

कारवाई थांबण्यासाठी कोणी फोन केला, दबाव आणला तर त्यांची नावे जाहीर करण्याची महापालिका आयुक्तांची भूमिका योग्य आहे.

 

बेकायदेशीर बांधकाम किंवा बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालणं हे चुकीचे आहे.

 

अतिक्रमण विभागातील अधिकारी वर्गाची देखील चौकशी करणे आवश्यक आहे. इतकी अतिक्रमणे उभी राहत असतील तर व्यवस्था म्हणून काय केले, याचा जाब सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी देणे आवश्यक आहे आणि आयुक्तांनी तो घेणे आवश्यक आहे.

 

शहरातील मुख्य रस्त्यांवर Fix Points उभे करणे सहज शक्य आहे. महानगरपालिकेचे 5000 सफाई कर्मचारी सध्या रिकामे आहेत, म्हणजे त्यांच्या नेमून दिलेल्या कामापासून त्यांना लांब केले आहे. ही 5000 कर्मचाऱ्यांची टीम आयुक्त साहेबांनी या अतिक्रमण मोहिमेमध्ये Fix Point कर्मचारी म्हणून लावली तर त्याचा फायदा निश्चित होईल.

 

सकाळी ड्रोन उडवून त्या भागातली परिस्थिती काय आहे हे सध्या बघणे अतिशय सोपे आहे. तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे.

 

पथारीवाल्यांचे धोरण आणि पार्किंगचे धोरण सर्व पक्ष नेत्यांनी एकत्र येऊन लवकरात लवकर मंजूर केले पाहिजे.

 

आयुक्तांनी कुठल्याही परिणामाला सामोरे जाण्याची तयारी दर्शविणे अभिनंदनास पात्र आहे. साहेब हे पुणे आहे. राजकीय कारणासाठी एखाद्याची बदली केली तर पुणेकर रस्त्यावर उतरतात. पुणेकरांना कोणी हलक्यात घेऊ नये. सन्माननीय मुख्यमंत्री यांचे पुण्यावर विशेष लक्ष असल्यामुळे चिंता करायची गरज नाही.

 

रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांचा रस्ता याला प्राधान्य दिले पाहिजे. नागरिक म्हणून आपणही काही बंधने घालून घेतली पाहिजेत. कुणाकडून खरेदी करायची हे देखील ठरवावे लागेल. नो एन्ट्री मधून कितीही जवळ पडलं तरी जाणार नाही हाही निश्चय करावा लागेल.

 

शेवटी या शहराचे भवितव्य आपल्या लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासनाच्या हातामध्ये आहे. त्यांना आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.

 

एक अॅप देखील सहज डेव्हलप करता येईल. त्याचा देखील आयुक्त साहेबांनी विचार करावा. रोज केलेल्या कारवाईची माहिती संकेतस्थळावर टाकावी.

 

आम्ही माननीय आयुक्त साहेब आणि माननीय नगरसेवक बंधू-भगिनी तुमच्यासोबत आहोत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments