अंतिम फेरीची चुरस वाढत असताना झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’मध्ये दमदार सादरीकरणे, भावनिक खुलासे आणि थक्क करणाऱ्या अनपेक्षित घडामोडींनी स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे. टॉप 10 स्पर्धकांनी आपल्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यानिमित्ताने या शनिवार-रविवारच्या भागांमध्ये त्यांची नैसर्गिक प्रतिभा, वैविध्यपूर्ण गायन आणि त्यांच्यातील मैत्री यांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. या उत्साहात भर घालत नीति मोहन परीक्षकांच्या आसनावर दिमाखात पुनरागमन करणार आहे. तिच्या खळाळत्या उत्साहाने आणि नेहमीच्या आपुलकीने ‘म्युझिक का संगीतस्थान’ पुन्हा एकदा गजबजून जाणार आहे!
पहिल्या ठेक्यापासून मंचाला आग लावणाऱ्या गीताश्रीने ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हे सादरीकरण इतके दमदार केले की पहिल्या 10 सेकंदांतच तिच्यासाठी बझर वाजला आणि सोनेरी वर्षावही झाला. त्यानंतर सूत्रसंचालक श्रेयस तळपदेसोबतच्या तिच्या मिश्किल गप्पांनी प्रेक्षकांमध्ये हास्याची लकेर उमटवली. ‘कहीं दूर जब’च्या भावपूर्ण सादरीकरणाने सहजदीपने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले आणि त्याच्यावरही सोनेरी वर्षाव झाला. त्याचे गायन ऐकून भारावलेले परीक्षक शंकर महादेवन यांनी त्याचे भरभरून कौतुक केले, “तुझे गाणे प्रत्यक्ष ऐकायला मिळणे हे आमचे भाग्य आहे.”
सुरांची ही मैफिल अशीच पुढे रंगत जाईल. ‘सजदा’च्या सादरीकरणाने मीर सर्वांना मंत्रमुग्ध करेल आणि उपस्थित प्रेक्षक उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याला दाद देतील. ‘सजदा’ ही स्वतः शंकर महादेवन यांची संगीत रचना असल्याने हा क्षण आणखी खास ठरणार आहे. याच भागात मीर आणि लोकप्रिय सुफी गायक बिस्मिल यांची अविस्मरणीय जुगलबंदीही रंगणार असून तुतारीच्या निनादाने या जल्लोषात आणखी भर पडणार आहे. याच भागातील एका भावस्पर्शी क्षणी बिस्मिल आपल्या प्रेरणादायी सांगीतिक प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने बोलेल. कोविड-19 च्या लॉकडाऊनदरम्यान ‘बिस्मिल की महफिल’ची कल्पना कशी सुचली, त्यांच्या कुटुंबाला लाभलेला समृद्ध सांगीतिक वारसा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी कोणत्या संघर्षांवर मात केली, अशा अनेक आठवणींना तो उजाळा देणार आहे.
कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवत अयान ‘बदन पे सितारे’च्या दमदार सादरीकरणाने मंच दणाणून सोडेल. त्याच्या गायनावर उपस्थित प्रेक्षक उभे राहून टाळ्यांच्या गजरात दाद देतील, तर शंकर महादेवन त्याचे भरभरून कौतुक करताना म्हणाले, “अयान, तू रॉकस्टार आहेस!” शिवानीनेही आपल्या सादरीकरणातील बारकाव्यांसह परीक्षकांना प्रभावित केले. तिच्या गायनात उदित नारायण यांच्या खास शैलीची झलक जाणवल्याचे शंकर महादेवन यांनी सांगितले.
पुढच्या भागात हा जल्लोष शिगेला पोहोचेल. ‘मेरा नाम चिन चिन चू’च्या दमदार सादरीकरणाने गीतने मंचावर अशी रंगत आणली की उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात तिला दाद दिली. तिच्या सादरीकरणाने भारावलेली नीति मोहन म्हणाली, “सादरीकरणाची कला तुझ्या अंगातच आहे. वयाच्या 16व्या वर्षी तू इतके अप्रतिम गायन करशील याची मी कल्पनाही करू शकत नाही.” या गाण्याला आपल्या नृत्याने अजरामर करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री हेलन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘सा रे ग म प’च्या सर्व परीक्षकांनी एकत्र येऊन ‘हॅपी बर्थडे’ हे गाणेही गायले. या खास क्षणी सेटवर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मंचाबाहेरचाही एक भावस्पर्शी प्रसंग या भागात पाहायला मिळाला. काही दृष्टिहीन स्पर्धक गीतने त्यांच्यासाठी आपुलकीने केलेल्या खास कृतीबद्दल सांगतील. या प्रसंगातून स्पर्धेपलीकडेही या टॉप 10 स्पर्धकांमध्ये जुळलेले जिव्हाळ्याचे नाते दिसून येईल.
या सुरेल सोहळ्याची सांगता कदंबच्या ‘ऐ अजनबी’ या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने होणार आहे. त्याचे गाणे ऐकताना जावेद अली यांनी उत्स्फूर्तपणे त्याला गायनात साथ दिली. त्यानंतर परीक्षकांनी कदंबला ‘बिजुरिया’ गाण्याचे अनपेक्षित आव्हान देत त्याच्या अष्टपैलू गायनाची परीक्षा घेतली. या आव्हानाने क्षणभर भांबावलेल्या कदंबने लगेच सावरून रंगतदार सादरीकरण केले आणि ते ऐकून परीक्षक आणि स्पर्धकही जागेवरून उठून त्याच्या गाण्यावर थिरकले!
सुपरहिट गाणी, मनाला भिडणाऱ्या कहाण्या आणि निखळ मनोरंजन घेऊन ‘सा रे ग म प’च्या टॉप 10 स्पर्धकांचा खास सोहळा या शनिवार-रविवारी रंगणार आहे. ही सुरेल मेजवानी पाहायला विसरू नका!
पहा ‘सा रे ग म प’ या शनिवार आ
णि रविवारी फक्त झी टीव्हीवर!


