संरक्षण, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील उपयोजनांसाठी मानवरहित आणि स्वायत्त प्रणाली विकसित करणारी आणि मुंबईत मुख्यालय असलेली तंत्रज्ञानाधारित कंपनी सागर डिफेन्स इंजिनिअरिंग लिमिटेडने आपल्या आयपीओसाठी सेबीकडे यूडीआरएचपी-I दाखल केला आहे.
या ऑफरमध्ये 1,200 कोटी रु. पर्यंतचे प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी समभागांचे फ्रेश इश्यू आणि 2,212 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे. त्यायोगे या सार्वजनिक समभाग विक्रीचा एकूण आकार 3,412 कोटी रु. पर्यंत असेल. ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून (निकुंज पराशर, मृदुल बब्बर, लक्ष्य डांग, सौरभ अविनाश पाटील, अंकित कुमार, अमित सिंगला आणि मनोज कन्हैयालाल अग्रवाल) 970 कोटी रु. पर्यंत, प्रवर्तक समूह विक्री समभागधारकांकडून 480 कोटी रु. पर्यंत आणि इतर विक्री समभागधारकांकडून 762 कोटी रु. पर्यंतच्या समभागांची विक्री केली जाणार आहे.
यूडीआरएचपी-I दाखल करण्यापूर्वी कंपनीने BRLMs यांच्या सल्लामसलतीने प्री-आयपीओ प्लेसमेंट पूर्ण केले. याअंतर्गत प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याचे 30,841,986 इक्विटी समभाग प्रति समभाग 97.27 रु. या दराने जारी करण्यात आले. यामध्ये प्रति समभाग 95.27 रु. प्रीमियमचा समावेश होता. या प्लेसमेंटद्वारे एकूण 300 कोटी रु. उभारण्यात आले. SCRR च्या नियम 19(2)(b) नुसार, उभारण्यात आलेली ही रक्कम फ्रेश इश्यूमधून वजा करण्यात आली असून त्यामुळे नवीन इश्यूचा आकार आता 1,200 कोटी रु. पर्यंत राहणार आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटमधून मिळालेल्या निधीचा वापर सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाणार आहे.
मूळतः 2015 मध्ये सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने स्थापन झालेली ही कंपनी मुंबईतील नोंदणीकृत कार्यालयातून आणि पुण्यातील एमआयडीसी चाकण औद्योगिक क्षेत्रातील कॉर्पोरेट कार्यालयातून आपले कामकाज चालवते. मे 2026 मध्ये कंपनीने सागर शिप रिपेअर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील 100% हिस्सा अधिग्रहित केला असून, ही कंपनी आता तिची उपकंपनी आहे. याशिवाय, कंपनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील जुव्वालादिन्नी फिशिंग हार्बर येथे स्वायत्त सागरी जहाजबांधणी प्रकल्प आणि प्रणाली विकास केंद्र उभारत आहे. या प्रकल्पामध्ये 22 एकर क्षेत्रफळाच्या उत्पादन आणि तंत्रज्ञान संकुलाचा समावेश असून ते कंपनीचे प्रमुख दीर्घकालीन उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या दस्तऐवजात नमूद केलेली उद्योगविषयक आकडेवारी 13 नोव्हेंबर 2026 रोजीच्या केअरएज रिसर्चच्या अनमॅन्ड सिस्टिम्स इंडस्ट्री वरील अहवालातून घेण्यात आली आहे.
कंपनीचे निव्वळ उत्पन्न खालील उद्देशांसाठी करण्याचा प्रस्ताव आहे.
जेएम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि यूबीएस सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. कंपनीला बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांकडून तत्त्वतः मान्यता मिळाली असून, या बाजारांवर कंपनीचे इक्विटी समभाग सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
यूडीआरएचपी लिंक:
https://www.sagardefence.com/investor/file/cba87701-d6b7-43c5-805f-49c752cbda0e?v=offer-documents%2Foffer-documents%2F1795084851748-31a51a56-6ab6-4c85-8b09-c230a58c6e8a.pdf


