पुणे: २३ नोव्हेंबर
भारतीय सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेणा-या इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट ॲण्ड एक्सलन्स ॲवॉर्ड २०२६ या सोहळ्यात ‘कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँके’ला एक्सलन्स इन एनपीए मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. नवी दिल्ली येथील हॉटेल अशोकामध्ये गुरुवार (दि. १९) हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन आपटे आणि संचालक श्री. प्रवीणकुमार गांधी यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. भारतीय सहकार क्षेत्रातील विविध राज्यांतील सुमारे ४०० मान्यवर प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्यात देशभरातील सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिमत्वांना गौरविण्यात आले. आरबीआय सेंट्रल बोर्डाचे माजी संचालक श्री. सतीश मराठे, नॅफ्कबचे अध्यक्ष लक्ष्मी दास, इंडियन को-ऑपरेटिव्हचे संपादक श्री अजय झा, ज्योतींद्र मेहता तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे: २३ नोव्हेंबर
भारतीय सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेणा-या इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट ॲण्ड एक्सलन्स ॲवॉर्ड २०२६ या सोहळ्यात ‘कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँके’ला एक्सलन्स इन एनपीए मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. नवी दिल्ली येथील हॉटेल अशोकामध्ये गुरुवार (दि. १९) हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन आपटे आणि संचालक श्री. प्रवीणकुमार गांधी यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. भारतीय सहकार क्षेत्रातील विविध राज्यांतील सुमारे ४०० मान्यवर प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्यात देशभरातील सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिमत्वांना गौरविण्यात आले. आरबीआय सेंट्रल बोर्डाचे माजी संचालक श्री. सतीश मराठे, नॅफ्कबचे अध्यक्ष लक्ष्मी दास, इंडियन को-ऑपरेटिव्हचे संपादक श्री अजय झा, ज्योतींद्र मेहता तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात
आला.


