Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रोमा-कार्नी अहवाल: प्रीमियम उत्पादने, पोर्टफोलिओ विस्तार आणि नवीन बाजारपेठा भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या...

क्रोमा-कार्नी अहवाल: प्रीमियम उत्पादने, पोर्टफोलिओ विस्तार आणि नवीन बाजारपेठा भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढवणार; ₹३ लाख कोटींचा पुढचा टप्पा गाठण्याची अपेक्षा

 

देशातील इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ २०२४ मधील ₹७ लाख कोटींवरून २०३० पर्यंत ₹१० लाख कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

महागडे होत जाणारे स्मार्टफोन्स, इन्व्हर्टर एसीचे वर्चस्व आणि मोठ्या टीव्हीची वाढती लोकप्रियता यामुळे सर्वसामान्य ग्राहक प्रीमियम फीचर्सना सर्वात जास्त पसंती देत आहेत.

२०२२ ते २०२५ दरम्यान लहान शहरांतील कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ मेट्रो शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढली.

 

राष्ट्रीय, १७ नोव्हेंबर २०२६: टाटा समूहाचा एक भाग आणि भारतातील आघाडीचा ओम्नीचॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असलेल्या ‘क्रोमा’ने मुंबईतील जुहू येथे आपले पहिले स्टोअर सुरू केल्याच्या २० वर्षपूर्तीनिमित्त यंदा आपले १००वे वर्ष साजरे करत असलेल्या ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म ‘कार्नी’च्या सहकार्याने ‘हाऊ इंडिया अपग्रेड्स’ (How India Upgrades) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील ग्राहकांचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, हे या अहवालातून दिसून येते. यासोबतच, देशातील खरेदीच्या पुढील नवीन पर्वाला दिशा देणाऱ्या मुख्य कारणांचाही या अहवालात वेध घेण्यात आला आहे.

 

इन्फिनिटी रिटेल लिमिटेड – क्रोमाचे सीईओ आणि एमडी शिबाशिष रॉय म्हणाले की,“गेल्या दोन दशकांत भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ पहिल्यांदाच एखादी वस्तू खरेदी करण्याच्या टप्प्यापासून पुढे सरकली आहे. आता ग्राहकांचा कल अधिक चांगला अनुभव, उच्च आकांक्षांची पूर्तता आणि सतत ‘अपग्रेड’ होण्याकडे वाढत असल्याचे आम्ही पाहिले आहे. ‘हाऊ इंडिया अपग्रेड्स’ या अहवालाद्वारे आम्ही ग्राहकांच्या सवयींमधील हेच बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील दिशा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तंत्रज्ञान जसजसे अधिक आधुनिक होत आहे, तसतशी क्रोमामधील आमची भूमिका हीच आहे की आम्ही योग्य उत्पादने, तज्ञांचा सल्ला, किफायतशीर योजना आणि विक्रीनंतरची उत्तम सेवा देऊन ग्राहकांचा इलेक्ट्रॉनिक्स खरेदी आणि वापराचा प्रवास सोपा करावा; जेणेकरून देशभरातील ग्राहक पूर्ण विश्वासाने अपग्रेड करू शकतील.”

 

कार्नी इंडियाच्या चेअरमन कौशिका माधवन म्हणाल्या की,“भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे भविष्य केवळ किती उपकरणांची विक्री होते यावर ठरणार नाही, तर ग्राहक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले जीवनमान कसे उंचावतात यावर ठरेल. प्रीमियम उत्पादनांना मिळणारी वाढती पसंती, उदयोन्मुख लहान शहरांतील वाढती मागणी आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यांचा हा संगम नावीन्य, मूल्यनिर्मिती आणि दीर्घकालीन विकासाच्या नव्या संधी निर्माण करत आहे.”

 

अहवालातील ठळक निष्कर्ष:

महानगरे आणि मोठ्या शहरांच्या पलीकडे विस्तारत आहे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची वाढ

२०२२ ते २०२५ दरम्यान तृतीय श्रेणी शहरांमध्ये क्रोमाची विक्री ४०% वार्षिक दराने वाढली. तर, प्रथम श्रेणी शहरांमध्ये हा दर ३५%, द्वितीय श्रेणी शहरांमध्ये ३०% आणि मोठ्या शहरांमध्ये १३% इतका राहिला.

क्रोमाच्या एकूण विक्रीत लहान बाजारपेठांचा वाटा २०२२ मधील ३२% वरून वाढून २०२५ मध्ये ४४% वर पोहोचला आहे.

एकूण मागणीच्या बाबतीत महानगरे व मोठी शहरे आजही आघाडीवर आहेत आणि पुढेही त्यांची वाढ सुरूच राहील; मात्र लहान शहरे त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने पुढे जात आहेत. यामुळेच भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वाढीच्या पुढील टप्प्यात या लहान शहरांची भूमिका सातत्याने महत्त्वा

ची ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments