Thursday, November 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतातील आणि जगभरातील २००हून अधिक प्रदर्शकांना एकत्र आणणाऱ्या ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’चे...

भारतातील आणि जगभरातील २००हून अधिक प्रदर्शकांना एकत्र आणणाऱ्या ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’चे पुण्यात उद्घाटन! पुण्यातील सर्वात मोठे प्रवास प्रदर्शन

 

पर्यटन व्यवसाय आणि भागीदारी यांच्या नव्या संधींचे प्रवेशद्वार

आयआयटीएम पुणे : २६ ते २८ नोव्हेंबर २०२६

स्थळ : डेक्कन कॉलेजचे मैदान, येरवडा, बॉम्बे सॅपर्सजवळ, पुणे

वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

भारतातील आघाडीच्या प्रवास आणि पर्यटन प्रदर्शनांपैकी एक असलेल्या ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’चे (आयआयटीएम) आज पुण्यातील येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या मैदानावर उद्घाटन झाले. या प्रदर्शनात पर्यटन, प्रवास, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनस्थळे यांच्या प्रसिद्धीशी संबंधित विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

दि. २६ ते २८ नोव्हेंबर २०२६ या तीन दिवसांमध्ये आयोजित होणाऱ्या या प्रदर्शनात २००हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. त्यात भारतातील २५हून अधिक राज्यांचे आणि १०हून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांचे प्रतिनिधित्व करणारे प्रदर्शक आहेत. प्रवास क्षेत्रातील कंपन्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याची, व्यावसायिक संबंध वाढवण्याची, पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करण्याची आणि नव्या व्यावसायिक संधी शोधण्याची ही महत्त्वाची संधी आहे. या प्रदर्शनात पर्यटन मंडळे, प्रवास कंपन्या, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, टूर ऑपरेटर्स, पर्यटनस्थळ व्यवस्थापन कंपन्या, विमान कंपन्या, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ब्रँड्स आणि प्रवास सेवा पुरवठादार एकाच ठिकाणी सहभागी झाले आहेत.

‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ या प्रदर्शनाच्या निमित्ताने पर्यटनस्थळे, ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिक, पर्यटक आणि प्रवास उद्योगातील विविध कंपन्या एकत्र येत आहेत. पर्यटनस्थळांची प्रसिद्धी, व्यावसायिक संपर्क वाढवणे, नव्या पर्यटनस्थळांची माहिती देणे आणि पर्यटकांशी संवाद साधणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. देशांतर्गत तसेच परदेशातील पर्यटनासाठी पर्यटक पुरवणारी एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पुणे पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘आयआयटीएम’मध्ये सहभागी असणारी पर्यटनस्थळे आणि प्रवास कंपन्या यांना पुण्यातील वाढती पर्यटनाची आवड आणि सुट्टीसाठी प्रवास करण्याची मागणी यांचा फायदा घेण्याची संधी मिळत आहे.

भारतातील पर्यटनवैविध्याचे दर्शन

‘आयआयटीएम पुणे’च्या या प्रदर्शनात ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, गुजरात आणि केरळ ही राज्ये भागीदार राज्ये म्हणून सहभागी झाली आहेत. या राज्यांतील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वारसा, संस्कृती, निसर्गसौंदर्य, वन्यजीव, साहसी पर्यटन, आदरातिथ्य आणि पर्यटनाचे खास अनुभव यांची माहिती प्रदर्शनात दिली जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य पर्वत आणि दऱ्या, राजस्थानचा राजेशाही वारसा आणि वाळवंटातील सफरी, केरळमधील बॅकवॉटर आणि निसर्गरम्य पर्यटन, तसेच ओडिशातील समृद्ध संस्कृती, मंदिरे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळे अशा विविध पर्यटन अनुभवांची माहिती या प्रदर्शनात मिळते. या राज्यांमधील पर्यटनस्थळे पारंपरिक सुट्ट्यांसाठी तसेच वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अनेक पर्याय उपलब्ध करून देतात.

या प्रदर्शनात पश्चिम बंगाल, दिल्ली आणि तेलंगणा ही राज्ये विशेष राज्ये म्हणून सहभागी झाली आहेत. तेथील पर्यटनस्थळे, पर्यटनाशी संबंधित सेवा, सांस्कृतिक अनुभव, ऐतिहासिक ठिकाणे, शहरांतील पर्यटन, आदरातिथ्य आणि प्रवासाच्या संधींची माहिती येथे दिली जात आहे. या राज्यांच्या सहभागामुळे ‘आयआयटीएम’मधील पर्यटनस्थळांची विविधता आणखी वाढली आहे. तसेच, या प्रदर्शनामुळे पर्यटकांना देशांतर्गत आणि परदेशातील पर्यटनस्थळांचे नवे पर्याय जाणून घेता येतात. तसेच, भारतातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रवासाचे नियोजन करता येते.

 

 

टुरिझम मलेशिया – भागीदार देश

‘टुरिझम मलेशिया’ हा आयआयटीएम पुणेचा भागीदार देश आहे. त्याच्यामुळे प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप आले आहे. भारतीय पर्यटकांसाठी मलेशिया हे एक लोकप्रिय परदेशी पर्यटनस्थळ आहे. त्या दृष्टीने या प्रदर्शनात मलेशियाच्या पर्यटनाची खास वैशिष्ट्ये दाखवली जात आहेत.

मलेशियामध्ये पर्यटकांना विविध अनुभव घेता येतात. तेथील गजबजलेली शहरे, उष्णकटिबंधीय बेटे, खरेदी, मनोरंजन, खाद्यसंस्कृती, कौटुंबिक सुट्ट्या, निसर्ग, साहसी पर्यटन आणि सांस्कृतिक अनुभव या सर्व गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. या पर्यटनस्थळाची अधिक माहिती भारतीय पर्यटकांपर्यंत पोहोचवणे, मलेशियाला भेट देण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि भारतातील ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स व पर्यटकांशी संपर्क वाढवणे हा ‘आयआयटीएम’मधील मलेशियाच्या सहभागाचा उद्देश आहे.

या प्रदर्शनात १० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळे सहभागी झाली आहेत. त्यामुळे पर्यटकांना परदेशातील सुट्टीसाठी नवे पर्याय शोधता येतील. नव्याने लोकप्रिय होत असलेल्या पर्यटनस्थळांची माहिती घेता येईल. तसेच, पर्यटन प्रतिनिधी आणि प्रवास क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संवादही साधता येईल.

उद्घाटन सोहळ्याला प्रवास क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

‘आयआयटीएम पुणे’च्या उद्घाटन सोहळ्याला प्रवास क्षेत्रातील प्रमुख संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात पर्यटनाच्या विकासासाठी विविध संस्था आणि कंपन्यांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, पर्यटन क्षेत्राला चालना देण्यात प्रवास प्रदर्शनांची भूमिका स्पष्ट झाली.

सन्माननीय पाहुण्यांमध्ये ‘केरळ टुरिझम’च्या संचालिका श्रीमती अनु कुमारी (आयएएस), ‘टुरिझम मलेशिया’च्या संचालिका श्रीमती हरियांती अबू बकर, ‘राजस्थान टुरिझम’चे सहसंचालक श्री. दलीप सिंह, ‘जम्मू-काश्मीर टुरिझम’चे उपसंचालक श्री. पीर जाहिद अहमद, ‘ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ पुणे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वास केळकर , ‘ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. समीर कुलकर्णी, या संघटनेचे सचिव प्रमोद बिडकर, ‘ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ पुणे’चे अध्यक्ष निलेश भन्साळी, या संघटनेचे उपाध्यक्ष अमित पंडित, दीपक पुजारी आणि ‘ईटीएए’चे श्रीपाद देशपांडे यांचा समावेश होता.

या मान्यवरांच्या सहभागामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संबंध वाढवणे आणि पर्यटनस्थळे व प्रवास कंपन्यांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, या प्रदर्शनाच्या उद्देशाला अधिक महत्त्व मिळाले.

पर्यटन व्यवसाय आणि पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ

यावेळी बोलताना ‘स्पिअर ट्रॅव्हलमीडिया अँड एक्झिबिशन्स प्रा. लि.’चे संचालक संजय हखू म्हणाले, “पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे पर्यटन बाजारपेठेचे केंद्र आहे. पुण्यातील नागरिकांमध्ये देशांतर्गत आणि परदेशातील पर्यटनाची, वेगवेगळ्या प्रवासांचे अनुभव घेण्याची तसेच नव्या पर्यटनस्थळांना भेट देण्याची आवड वाढत आहे. भारतातील २५ हून अधिक राज्ये आणि १० हून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांचे प्रतिनिधित्व करणारे २०० हून अधिक प्रदर्शक आयआयटीएम प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. यातून पर्यटन क्षेत्रातील विविधता आणि या क्षेत्राची वाढती ताकद दिसून येते. आयआयटीएम हे केवळ प्रदर्शन नाही, तर पर्यटनस्थळे, प्रवास कंपन्या आणि पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणणारे हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. येथे व्यावसायिक संबंध निर्माण होतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि नव्या व्यावसायिक संधी मिळतात. प्रदर्शक आणि प्रवास क्षेत्रातील व्यावसायिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद झाला आहे.”

‘स्पिअर ट्रॅव्हलमीडिया अँड एक्झिबिशन्स प्रा. लि.’चे संचालक रोहित हंगल पुढे म्हणाले, “आजचे पर्यटक केवळ सुट्टीसाठी प्रवास करत नाहीत, तर त्यांना अर्थपूर्ण आणि आपल्या आवडीनुसार खास अनुभव देणाऱ्या सहलींची अधिक अपेक्षा असते. कमी परिचित असलेल्या पर्यटनस्थळांना भेट देणे, वेगवेगळे सांस्कृतिक अनुभव घेणे, साहसी पर्यटन, लक्झरी प्रवास आणि स्वतःच्या आवडीनुसार प्रवासाचे नियोजन करणे याकडे पर्यटकांचा कल वाढत आहे. आयआयटीएम हे पर्यटनस्थळांसाठीचे एक प्रभावी व्यासपीठ आहे. या माध्यमातून पर्यटनस्थळांना ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिकांपर्यंत पोहोचता येते. पर्यटकांना पर्यटन प्रतिनिधींशी थेट संवाद साधता येतो आणि प्रवासाच्या अनेक नव्या शक्यता जाणून घेता येतात. पुणे हे पर्यटनासाठीचे महत्त्वाचे बाजारपेठेचे शहर आहे. या प्रदर्शनाला येथे मिळालेल्या प्रतिसादामुळे पर्यटनस्थळे आणि प्रवासाच्या संधी पर्यटकांच्या अधिक जवळ आणण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.”

पर्यटनस्थळे आणि पर्यटक यांना जोडणारे व्यासपीठ

‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ हे प्रदर्शन पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धीसाठी आणि प्रवास क्षेत्रातील व्यावसायिकांशी संपर्क वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या प्रदर्शनात पर्यटन मंडळे, ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर्स, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, विमान कंपन्या, क्रूझ ऑपरेटर्स, पर्यटनस्थळ व्यवस्थापन कंपन्या आणि प्रवास सेवा पुरवठादार हे सर्वजण एकाच व्यासपीठावर एकत्र येतात.

या प्रदर्शनामुळे व्यावसायिक संपर्क वाढवता येतात, पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करता येते, प्रवास क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधता येतो, नव्या पर्यटन सेवा आणि पर्यायांची माहिती मिळते, तसेच, थेट पर्यटकांपर्यंत पोहोचता येते. सहभागी पर्यटनस्थळांना ट्रॅव्हल एजंट्स आणि टूर ऑपरेटर्सशी संपर्क साधण्याची संधी मिळते. प्रवासाचे निर्णय घेण्यात या व्यावसायिकांची महत्त्वाची भूमिका असते. त्याचबरोबर पर्यटनस्थळांना थेट पर्यटकांपर्यंत पोहोचता येते. त्यांच्या पर्यटन सेवांबद्दल पर्यटकांमध्ये आवड निर्माण करता येते.

पर्यटकांसाठीही हे प्रदर्शन उपयुक्त आहे. येथे देशांतर्गत आणि परदेशातील पर्यटनस्थळांची माहिती मिळते. प्रवासाचे नवे अनुभव जाणून घेता येतात. पर्यटन प्रतिनिधींशी आणि प्रवास क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधता येतो. तसेच, आगामी सुट्ट्यांसाठी स्वतःच्या किंवा ग्राहकांच्या प्रवासाचे नियोजन करता येते. पर्यटकांच्या बदलत्या आवडी, वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या पसंतीनुसार प्रवास करण्याची वाढती मागणी यामुळे पर्यटन क्षेत्रातही बदल होत आहेत. अशा वेळी आयआयटीएमसारखी व्यासपीठे ही पर्यटनस्थळे, प्रवास क्षेत्रातील व्यावसायिक आणि पर्यटक यांच्यात संपर्क निर्माण करण्यासाठी महत्त्वाची ठरतात.

‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ (आयआयटीएम) हे प्रदर्शन २६ ते २८ नोव्हेंबर २०२६ या काळात पुण्यातील येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. नव्या पर्यटनस्थळांची माहिती घेण्यासाठी आणि व्यावसायिक संधी शोधण्यासाठी हे प्रदर्शन प्रवास क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी खुले आहे.

‘आयआयटीएम’मध्ये ‘बी२बी’ म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे, तर तो आहे व्यावसायिक

प्रगतीसाठीचा एक महत्त्वाचा लाभ!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments