Saturday, November 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थिंनींच्या शिष्यवृत्ती निधीसाठी ‘फ्युएल’चा सोशल स्टॉक एक्स्चेंजवर दुसरा इश्यू  ...

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थिंनींच्या शिष्यवृत्ती निधीसाठी ‘फ्युएल’चा सोशल स्टॉक एक्स्चेंजवर दुसरा इश्यू  – एनएसईमध्ये 30 नोव्हेंबर रोजी बेल रिंगिंग सोहळा पार पडणार, मंत्री मंगलप्रभात लोढा व मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

 

 

पुणे, दि. २८:ग्रामीण महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील 25 विद्यार्थिनींसाठी समर्पित शिष्यवृत्ती निधी उभारण्यासाठी फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज (फ्युएल) ही संस्था सोशल स्टॉक एक्स्चेंजवर (एसएसई) आपल्या दुसऱ्या इश्यूसह येत आहे. या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग म्हणून सोमवारी, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत वांद्रे-कुर्ला संकुलातील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) ‘एनएसई अ‍ॅट्रियम’ येथे ‘बेल रिंगिंग सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ऑलकार्गो समूह आणि फ्युएलच्या माध्यामातून उभारण्यात आलेल्या ‘ऑलकार्गो स्कूल ऑफ लॉजिस्टिक्स’ या नवीन शाळेच्या स्थापनेची घोषणा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान, ऑलकार्गो समूहाचे अध्यक्ष व संस्थापक आणि आयआयएम मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. धोरणकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि भागीदार संस्था या प्रसंगी सहभागी होणार आहेत.

फ्युएल संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या निधीतून दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील 125 विद्यार्थिनींना पूर्ण शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला जाणार असून, त्याद्वारे सर्वसमावेशक शिक्षण आणि भावी पिढीच्या सक्षमीकरणाचा निर्धार पुढे नेला जाणार आहे. त्याचबरोबर वंचित आणि ग्रामीण भागातील तरुणांना लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी क्षेत्रात करिअरच्या जागतिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऑलकार्गो समूहा’च्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या ‘ऑलकार्गो स्कूल ऑफ लॉजिस्टिक्स’ची घोषणा यावेळी करण्यात येणार आहे. यामुळे हजारो तरुणांना उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्यांची दारे खुली होतील. या उपक्रमांतर्गत 100 पात्र विद्यार्थ्यांना ‘लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन’ या विषयातील दोन वर्षांचा पूर्णतः विनामूल्य एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी 50 मुलांना आणि दुसऱ्या वर्षी 50 मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

 

30 नोव्हेंबर रोजी आयोजित सोहळ्यात १८ हून अधिक राज्यांमध्ये ‘फ्युएल’चे कार्य पुढे नेण्यास मदत करणाऱ्या भागीदार आणि मार्गदर्शकांचाही सत्कार केला जाणार आहे. याशिवाय, इच्छुक मार्गदर्शकांना एका पात्र विद्यार्थ्याचा पूर्ण प्रवास घडवण्याची संधी देणारा ‘२५ मेंटर-मेंटी’ उपक्रम आणि दोन वर्षांच्या पदवी शिक्षणाची फी, पुस्तके, कौशल्य प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी ऐच्छिक सहकार्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘फ्युएल’च्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाखांहून अधिक युवकांना मार्गदर्शन, 2.93 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, 2 हजार 900 हून अधिक शिष्यवृत्ती आणि 90 हून अधिक सीएसआर भागीदारांच्या माध्यमातून कार्य उभारण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी दिली असून, हा टप्पा महाराष्ट्र आणि भारतातील युवकांचा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments