Saturday, November 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedभगवद्गीता – गांधीजींच्या चिंतनातून’ पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार प्रदान

भगवद्गीता – गांधीजींच्या चिंतनातून’ पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार प्रदान

 

 

‘भगवद्गीता – गांधीजींच्या चिंतनातून’ या रोहन प्रकाशनने प्रसिध्द केलेल्या माझ्या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था या मान्यवर संस्थेचा यंदाचा पुरस्कार शनिवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गो. बं. देगलूरकर यावेळी उपस्थित होते. लोकमान्य टिळक आणि न्या. रानडे यांच्या प्रेरणेने १८९४ मध्ये ही संस्था स्थापन झाली.

प्रस्तुत पुस्तक हे गांधीजींनी २४ फेब्रुवारी ते २७ नोव्हेंबर १९२६ या काळात साबरमती आश्रमात केलेल्या व्याख्यानांवर आधारीत आहे. त्या काळात गांधीजी गीतेचं गुजराथीत भाषांतर करत होते. सकाळच्या प्रार्थनेनंतर ते गीतेवर नियमितपणे भाष्य करत असत. त्यांचे सहायक महादेव देसाई हे या भाषणांची टिपणं घेत होते. त्यांची टिपणं गांधीजींनी स्वतः तपासून दिली होती. १९५५ मध्ये ती पुस्तकरुपाने प्रथम गुजराथीत तर १९५९ मध्ये इंग्रजीत प्रसिध्द झाली. गांधीजींचे गीतेविषयीचे विचार मराठीत आणण्याची संधी मला या पुस्तकामुळे मिळाली. योगायोगाने गांधीजींच्या १५० व्या जयंती दिनी म्हणजे २ ऑक्टोबर २०१९ रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली.

आणखी एक विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या परदेश दौ-यात अमेरिका, जर्मनी, जपान आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांना हेच मूळ इंग्रजी पुस्तक भेट दिलं होतं.

माझे मेव्हणे कै. आनंद वैदय ( माझी दिवंगत बहीण लेखिका सरिता वैद्य हिचे पती ) यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा गौरव पुरस्कार विनिता देशपांडे यांना तर आनंद केळकर स्मृती पुरस्कार प्रसिध्द अभिनेते योगेश सोमण यांना यावेळी देण्यात आला. निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, प्रसिध्द लेखिका नयना सहस्रबुध्दे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

– भगवान दातार

bhagwandatar@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments