Sunday, November 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरीसीमन (delimitation) बिल' कोणाचा बाप रोखू शकत नाही... ही मुख्यमंत्र्यांची 'गाव गुंडाची'...

परीसीमन (delimitation) बिल’ कोणाचा बाप रोखू शकत नाही… ही मुख्यमंत्र्यांची ‘गाव गुंडाची’ भाषा…!  ⁃ ‘काँग्रेस’ची टीका   ⁃ -‘चोरी ते चोरी..पुन्हा शिरजोरी’… वर्तन स्वाभिमानी महाराष्ट्रास न रुचणारे….!   ⁃ वरीष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी 

 

पुणे – दि २८ –

शिवछत्रपतींचा, संताचा, छ शाहू – फुले – आंबेडकर, टिळक, गोखले, आगरकरां पासुन ते थोर साहीत्यीक, समाजसुधारक ते स्व यशवंतरावजी चव्हाण, वसंतराव नाईक, स्व वसंतदादा पाटिल, शरदरावजी पवार, मनोहर जोशी ते पृथ्वीराज चव्हाण साहेबां पर्यंत.. मुख्यमंत्री’ पदे भूषवलेल्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून कधीही न वापरलेली अरेरावीपणाची, दर्पोक्तीयुक्त ‘गावगुंडाची भाषा’ महायुतीच्या (सुशिक्षित म्हणवणाऱ्या) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र आज वापरली व आपली स्वतःची लायकी सिद्ध केल्याची प्रखर टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

केंद्रातील सत्तेच्या बळावर फडणवीसांनी रात्री – अपरात्री वेष बदलून ‘राजकीय पक्षांची घरफोडी केली. राजकीय दरोडे’ टाकून पक्षफोडा-फोडी करून “अनैतिक व असंवैधानिक मार्गाने सहभागी झालेल्या खासदारांच्या” जिवावर निर्लज्जतेने संख्याबळाचा माज करत असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले.

ते पुढे म्हणाले की,

२०२४ लोकसभा_निवडणुकीत, जनतेने मविआ’ला

भाजप विरोधात ४८ पैकी ३१ खासदा दिले हेच सत्य आहे मात्र ‘लालची प्रलोभने, खोकी वा मजबुरी’ने भाजपन_महायुती कंपुत’ ओढून ताणून आणलेल्या खासदारांच्या जीवावर “कोणाच्या बापाची हिंमत नाही (?)” एवढी अहंकारी दर्पोक्ती करणे स्वाभिमानी महाराष्ट्राला न रुचणारे आहे.

महायुती_कंपूत गेलेल्या खासदारांनी जनतेने त्यांना (२०२४ निवडणुकीत) मोदी सरकार विरोधात दिलेला कौल’ लक्षात घेऊन, सदसदविवेक बुद्धीने मतदान केल्यास, फडणवीस तोंडावर आपटतील.. अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.

‘परीसीमन (delimitation) विधेयक’ बिलास राज्यातील (भाजप’ला अंकीत झालेल्या) खासदारांचा गृहीत धरलेला पाठिंबा हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील ‘लोकमताच्या व नैतिक बळावर’ मिळालेला नाही हे फडणवीसांनी विसरू नये व

मतचोरी, अवैध व असंवैधानिक दुष्कृत्ये करून सत्तेवर आलेल्यांनी ‘उन्माद व माज’ करू नये.. असा ईशारा ही त्यांनी दिला.

खासदारांना संविधानीक लोकशाही हत्त्येचे कृत्य करायला लाऊन पुन्हा बाप काढणे (?) कोणत्या ‘लोकमताच्या_शुद्ध_हेतूच्या कौलाचे व संविधानीक_कर्तव्यपुर्तीच्या पुरुषार्था’चे लक्षण आहे’ (?) असा तिखट सवाल ही वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

सत्ता_पक्षाचे विरोधात निवडून आलेल्यांना खरेदी करून, त्यांच्या मांडलिकत्वावर चलती असे पर्यंत व त्यांचेवर हुकूमशाहीयुक्त वर्चस्व मिळवल्यामुळेच् मुख्यमंत्र्यांनी ही भाषा केली मात्र लोकशाही’चे उर्वरित स्तंभ प्रशासन व न्यायव्यवस्था, अजुन तरी पुर्णपणे बटीक झालेल्या नाहीत, याचे ही स्मरण ठेवाल तर ते हिताचे राहील, त्यामुळे “चोरी ते चोरी..पुन्हा शिरजोरी”.. हे वर्तन स्वाभिमानी महाराष्ट्रास रुचणारे नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली..!

————///———————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments