Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृती कार्यक्रम

पिंपरी विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृती कार्यक्रम

दि.१३ एप्रिल २०२४

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याअनुषंगाने २०६ पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या नियंत्रणाखाली कार्यक्षेत्रात मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

 

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे दिशा सोशल फाउंडेशनचा वर्धापन दिन सोहळा नुकताच संपन्न झाला. अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमांत नोडल अधिकारी विजय भोजने,मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक यांनी लोकसभा निवडणुकीबाबत माहिती देऊन जनजागृती केली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक तसेच मान्यवर मंडळींनी “१३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आम्ही लोकशाही प्रती जागरूक राहू तसेच जात, समुदाय, भाषा वा इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजाऊ ” अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा,तसेच मतदान जागृती करण्याचाही निर्धार व्यक्त केला.

 

   या कार्यक्रमासाठी राजेंद्र करपे,संतोष बाबर, संतोष निंबाळकर, नंदकुमार कांबळे, गोरख भालेकर, नाना शिवले, सचिन साठे, संतोष चांदेरे, भरत आल्हाट, समीर काळभोर, बाजीराव लोखंडे, महेंद्र चिंचवडे, अविनाश ववले, विजय कांबळे, शरीफ शेख, प्रवीण कुदळे, राजेश सावंत, गुरुदास भोंडवे, गणेश लंगोटे, अतुल शिंदे, किशोर जवळकर, डॉ. श्याम अहिरराव या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments