Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedठाण्यातील फ्रेमबॉक्स संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलेचे प्रदर्शन...*

ठाण्यातील फ्रेमबॉक्स संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलेचे प्रदर्शन…*

ठाणे, प्रतिनिधी – कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी फ्रेमबॉक्सने आयोजित केलेल्या वार्षिक कला प्रदर्शनातून मिळाली. फ्रेमबॉक्स हि एक शैक्षणिक संस्था असून मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था आहे. वार्षिक कला प्रदर्शन हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्वाचा उपक्रम असून यंदा “आर्ट जर्नी”चे प्रदर्शन कलारसिकासाठी खुले करण्यात आले होते. ठाणे पश्चिममधील नौपाडा भागातील गोखले रोडवरील पॅराडाईज टॉवर येथे फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूट हे एकदिवसीय प्रदर्शन होते. याचे उद्घाटन फ्रेमबॉक्स २.० चे संस्थापक व संचालक राजेश तुराखिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी गुप्ता, ठाणे केंद्राचे प्रमुख चंद्र शेखर त्रिपाठी, व्यवस्थापिका स्वप्नाली कांबळे ढेकळे उपस्थित होत्या.

 

यावेळी प्रदर्शनात प्रामुख्याने राम मंदिर प्रतिकृती, कार्स ऑन द रोड आणि कोको सिनेमा अशा वेगवेगळ्या ऍनिमेशन सिनेमांची कलाकृती यावेळी विद्यार्थ्यांनी साकारली होती. तसेच ऍनिमेशन निर्मिती प्रक्रिया कशी पार पडते, त्यासाठी लागणारे उत्कृष्ट असे २डी आणि ३ डी चित्रे कशी रेखाटतात याचे प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले होते. तर शिल्पकला विभागातील विद्यार्थ्यांनी सेट तयार करण्यापासून ते खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात कशा असू शकतात हे दाखवून दिले. शिल्प व रचना शिल्प साकारताना फायबर, लाकूड, वेगवेगळ्या प्रकारचे  दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविल्या होत्या. तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरणारे होते. त्यामुळे आपल्या पाल्याची आवड लक्षात घेऊन त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

 

वार्षिक कला प्रदर्शनमध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्टच कलाकृती प्रदर्शित केल्या जातात व त्या मधून उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण वर्गकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. या प्रदर्शनात प्रदर्शित केलेल्या चित्र, शिल्प व वस्तू पाहून अनेक कलादालने अथवा व्यावसायिक कंपन्याद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. त्यासाठी या प्रदर्शनाचे महत्व वेगळे आहे. या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली व्यक्तिचित्र निसर्ग चित्र, स्थिर चित्र प्रदर्शित केली. त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित विविध पद्धतीने चित्र साकारली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments