Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedदि. १९ ते २५ एप्रिल कालावधीत  पुण्यात बाल चित्रपट महोत्सव  

दि. १९ ते २५ एप्रिल कालावधीत  पुण्यात बाल चित्रपट महोत्सव  

 

दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यातील बाल गोपालांचे मोठ आकर्षण असलेल्या बाल चित्रपट महोत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून दि. १९ ते २५ एप्रिल या कालावधीत सिटी प्राईड कोथरूड येथे हा मोहोत्सव संपन्न होईल. मोहोत्सवाच्या कालावधीत रोज सकाळी १० वाजता बाल गोपाळांना मोफत चित्रपट दाखवले जाणार असून श्यामची आई, वेल डन बॉईज, ताजमाल, म्होरक्या, जिप्सी, उबुंटू आणि छबीला हे गाजलेले बाल चित्रपट मोहोत्सावात दाखवले जातील. ‘संवाद पुणे आणि कावरे आईसक्रीम’ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही या मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटासाठी येणाऱ्या बाल गोपाळांना कावरे आईसक्रीम तर्फे मोफत आईसक्रीम दिले जाणार आहे कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, बढेकर ग्रुपचे प्रमुख प्रवीण बढेकर आणि सिटी प्राईड कोथरूडचे अरविंद चाफळकर यांच्या मौलिक सहकाऱ्यामुळेच हे सर्व चित्रपट बाल गोपाळांना मोफत दाखवणे शक्य झाले आहे असे संवाद पुणे चे अध्यक्ष सुनील महाजन आणि कावरे आईसक्रीमचे राजूशेठ कावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या चित्रपट मोहोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिटी प्राईड कोथरूड येथे ‘श्यामची आई’ चित्रपटात छोट्या श्यामची अप्रतिम भूमिका साकारणारा बालाकाराकार शर्व गाडगीळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, कोहिनूर ग्रुपचे कृष्कुमार गोयल, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर आणि सिटी प्राईड कोथरूडचे अरविंद चाफळकर यांच्या हस्ते संपन्न होईल. असे सांगून सुनील महाजन व राजूशेठ कावरे म्हणाले की, शुक्रवार, दि. १९ – श्यामची आई, शनिवार, दि. २० – वेल डन बॉईज, रविवार, दि. २१ – ताजमाल, सोमवार, दि. २२ – म्होरक्या, मंगळवार, दि. २३ – जिप्सी, बुधवार, दि. २४ – उबुंटू आणि गुरुवार, दि. २५ – छबीला असे या मोहोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, मराठी माणसांच्या पिढ्यांपिढ्यां अंतःकरणात अढळ स्थान असलेल्या ‘श्यामची आई’चा सुजय डहाके दिग्दर्शित नवा आविष्कार असलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ होत असून यंदाच्याच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाणकारांची भरपूर प्रशंसा मिळविलेल्या अनिल भालेराव दिग्दर्शित ‘छबिला’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करून प्रख्यात अभिनेते बनलेले महेश कोठारे यांच्या हस्ते या बाल चित्रपट मोहोत्सवाची सांगता होईल.

 

तीन वर्षांपूर्वी ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट बालपटाचा सन्मान संपादन करणाऱ्या अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ सोबतच गतवर्षी ‘राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या नियाझ मुजावर लिखित-दिग्दर्शित ‘ताजमाल’चा या महोत्सवात समावेश आहे. या वर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुण्याच्या कबीर खंदारे या बाल अभिनेत्यास ज्यूरींचे विशेष पारितोषिक मिळवून देणारा शशी खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’ महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असणार आहे.

या शिवाय मोहन जोशी आणि विजय पाटकर यांच्या धमाल भूमिका असलेल्या प्रकाश जाधव दिग्दर्शित ‘वेल डन बॉइज’ आणि पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ हे चित्रपट या महोत्सवात उत्तम मनोरंजनाची हमी देणारे आहेत.

सुनील महाजन यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या रौप्यमहोत्सवी महोत्सवाच्या सूत्रधार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे या आहेत. राज काझी व केतकी महाजन-बोरकर हे संयोजक असून प्रोग्रॅम डायरेक्टर विशाल शिंदे हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments