बहुजन हिताय संघ, नांदेड सिटी, पुणे यांच्या सौजन्याने प्रथमच नांदेड सिटी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 133 वा जयंती सोहळा 14 एप्रिल 2024 रोजी मधुवंती क्लब हाऊस मध्ये संपन्न करण्यात आला. नांदेड सिटी ही आशिया खंडातील सर्वात मोठी टाउनशिप आहे. नांदेड सिटी च्या इतिहासात हा सुवर्ण क्षण म्हणून नोंदण्यात आला.
या सोहळ्या चे प्रस्ताविक प्रा. डॉ. सुभाष खंडागळे, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. जयकुमार भोंगळे आणि प्रा. डॉ. प्रफुल्ल बनसोड यांनी पार पाडले.
या सोहळ्या निमित्त माननीय मिलिंद पानपाटील (वॉटर अकॅडमी खडकवासला चे संचालक ) यांनी आलेल्या सर्व जनसमुदायाचे प्रबोधन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
डॉ. जयकुमार भोंगळे यांनी डॉ. आंबेडकंराचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तरच खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल असे नांदेड सिटी रहिवासीयांना आवाहन केले. तर डॉ. बनसोड यांनी भारताला आजची परिस्थिती विचारात घेता वैज्ञानिक अधिस्टाण असणाऱ्या बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी आशाताई नगराळे, मालतीताई गायकवाड व मीरा माणखेडकर यांचेही प्रबोधन पर भाषणे झाली. या प्रसंगी भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
माननीय मधुवंती सोसायटी चे चेअरमन देडगे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले व नांदेड सिटी कॉन्स्ट्रुकशन कंपनी चे संचालक ऍडव्होकेट नरसिंह लगड यांची विशेष उपस्थिती होती.
जयंती निमित्त राहुल हरिभक्त, डॉ. प्रकाश गाडे, सुनील दांडगे, प्रवीण कांबळे, डेविड मेश्राम, सरोज रामटेके, यशवंतराव माणखेडकर, सुशांत गणवीर, अमर बनसोडे, डॉ. जया जाधव, मिलिंद गवई, पोलीस पाटील विशाल कदम, चेतन नगराळे दिशा माने, युवराज सावंत, राम बनसोडे यांनी जयंती पार पाडण्यासाठी खुप परिश्रम घेतले.


