Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ्लिपकार्टची व्हीआयपी सबस्क्रिप्शन योजना आता पुणे येथेही उपलब्ध

फ्लिपकार्टची व्हीआयपी सबस्क्रिप्शन योजना आता पुणे येथेही उपलब्ध

 

• सर्व व्हीआयपी ग्राहक आता ग्रोसरीच्या ऑर्डरवर अतिरिक्त बचत करू शकतील

• फ्लिपकार्ट व्हीआयपी सबस्क्रीप्शन योजनेची मेंबरशिप फी 499 रुपये असून त्यात वेगवान डिलिव्हरी, सुपर कॉइनचा वापर करून अतिरिक्त बचत अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

 

पुणे, एप्रिल १७, २०२४- ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव आणखी आनंददायी करण्यासाठी फ्लिपकार्ट ने अहमदाबाद भुवनेश्वर कोईम्बतूर, गुवाहाटी, हैदराबाद, पुणे आणि रांची येथील ग्राहकांसाठी व्हीआयपी सबस्क्रिप्शन योजना आणली आहे. बंगळुरू, दिल्ली, एनसीआर कोलकाता, आणि मुंबई या शहरातील यशानंतर फ्लिपकार्टने योजना या शहरात आणली आहे. या योजनेची अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यात १००% उत्पादनांची ४८ तासात मोफत डिलिव्हरी, सुपर कॉईन्स वापरून पाच टक्के अतिरिक्त बचत, ग्राहक सेवेची तातडीने संपर्क तसेच फक्त एक रुपयात क्लियर ट्रिप वर फ्लाईट कॅन्सल किंवा रिशेड्युल, 48 तासात वस्तू परत घेण्याची सुविधा आणि शॉपिंग फेस्टिवल च्या वेळी लवकर संधी अशा अनेक सोयी उपलब्ध आहेत. व्हीआयपी प्लॅन योजना घेतल्यावर ग्राहकांना आकर्षक परतावा मिळेल आणि फ्लिपकार्ट वर शॉपिंग करण्याचा त्यांचा आनंद अधिक वाढीला लागेल. सर्व नवीन व्हीआयपी ग्राहकांसाठी प्रत्येक ग्रोसरीच्या ऑर्डरवर बचतीसाठी मर्यादित काळासाठी ऑफर आहे. फ्लिपकार्ट चा लॉयल्टी प्रोग्राम (फ्लिपकार्ट प्लस आणि प्लस प्रिमियम) हा ग्राहकांच्या सेवेत असेलच आणि तोही व्हीआयपी योजनेचाच भाग असेल.

फ्लिपकार्ट ची व्हीआयपी सबस्क्रीप्शन योजना आठ शहरात लॉन्च झाल्याप्रसंगी फ्लिपकार्टचे ग्रोथ कस्टमर चे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभू सिंग म्हणाले, “फ्लिपकार्ट मध्ये आम्हाला ग्राहकांना कायमच उत्तम ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव देण्याचा प्रयत्न असतो. व्हीआयपी सबस्क्रिप्शन योजना हा त्याचाच एक भाग आहे ही योजना चार शहरात यशस्वी झाल्यानंतर आम्ही ती आता आठ शहरात आणत आहोत. ही योजना सोय, किंमत आणि ग्राहकांचा आनंद या अनुषंगाने फ्लिपकार्ट ची एक सर्वोत्तम योजना आहे. फ्लिपकार्टला ग्राहकांनी कायमच प्राधान्य द्यावे असा आमचा सतत प्रयत्न असतो.”

फ्लिपकार्टच्या सप्लाय चेन आणि कस्टमर चे प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत बद्री म्हणाले, “फ्लिपकार्टची व्हीआयपी सबस्क्रिप्शन योजना आमच्या लाखो ग्राहकांसमोर आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्यामुळे सोयी सुविधा आणि ग्राहकांचा आनंद यांना आणखीन चालना मिळेल. 48 तासात उत्पादनांची डिलिव्हरी, सुपर कॉइन्स वापरून अतिरिक्त बचत, कस्टमर सपोर्ट टीमशी सहज संवाद आणि शॉपिंग फेस्टिवल दरम्यान प्राधान्य यामुळे ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ग्राहकांचे समाधान वाढवणं आणि खरेदीची प्रक्रिया सुलभ करणे हा आमचा यामागचा मुख्य उद्देश आहे आणि त्यामुळे मला आम्हाला विश्वास आहे की देशभरातली सर्व ग्राहक फ्लिपकार्ट ला खरेदीसाठी नक्कीच प्रधान्य देतील.

फ्लिपकार्टच्या व्हीआयपी सबस्क्रिप्शन योजना घेण्यासाठीचे टप्पे खालील प्रमाणे आहेत

– सर्वप्रथम फ्लिपकार्टच्या वेबसाईट किंवा ॲपला भेट द्या

– तुमच्या अकाउंटला लॉगिन करा. तुम्ही फ्लिपकार्टवर नवीन असाल तर तुम्हाला तुमची माहिती देऊन अकाउंट तयार करावे लागेल.

– व्हीआयपी लँडिंग पेज वर स्क्रोल करा आणि Get VIP Benifits या बटणावर क्लिक करा.

– आता कंटिन्यू वर क्लिक करा पैसे भरा आणि पुढची प्रक्रिया पार पाडा.

– तुम्ही कोणत्या माध्यमातून पेमेंट करणार आहात याची माहिती भरा आणि ऑर्डर कन्फर्म करा.

– नोंदणी यशस्वी झाल्यावर तुम्हाला कन्फर्मेशन चा मेसेज वेबसाईट किंवा ॲप वर येईल.

भारतातील ई-कॉमर्स उद्योगाचा सातत्याने विस्तार होत आहे आणि फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग बरोबर तंत्रज्ञानाचा मेळ घालून हा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कायमच कटिबद्ध आहे.

फ्लिपकार्ट व्हीआयपी मेंबरशिपच्या अधिक माहितीसाठी आणि नवीन लॉयल्टी प्रोग्रामची योजनेची माहिती घेण्यासाठी फ्लिपकार्ट ॲपवर Flipkart FAQ page या पेजला भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments