Wednesday, October 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय विचारसाधनाच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन ▪️

भारतीय विचारसाधनाच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन ▪️

पुणे – दि. १७ – भारतीय विचार साधनातर्फे ‘अथातो संघजिज्ञासा’ आणि ‘अखंड भारत’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या शनिवारी २० एप्रिलला होणार आहे.

‘अथातो संघजिज्ञासा’ हे मधुभाई कुलकर्णी लिखित रा. स्व. संघाचा प्रवास मांडणारे पुस्तक आहे तर ‘अखंड भारत’ हे डॉ. सदानंद सप्रे लिखित आणि चित्तरंजन भागवत अनुवादित पुस्तक आहे. शनिवार दिनांक २० एप्रिलला दु. ३.३० वाजता सदाशिव पेठेतील भाविसा सभागृह येथे प्रकाशन सोहळा होणार आहे. रा. स्व. संघाचे पूर्व अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे आणि रा.स्व. संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments