तमिळ आणि तेलुगुमध्ये डब केलेल्या शोजमध्ये चाहत्यांच्या आवडत्या हंटर- टुटेगा नही तोडेगा, रक्षक – इंडियाज ब्रेव्ह्ज, फिजिकल वाला आणि इतर शोजचा समावेश!
प्रादेशिक भाषांत डब केलेल्या शोजचे मिनीटीव्हीवर मोफत प्रीमियर
मुंबई, 19 एप्रिल 2024 – अॅमेझॉन मिनीटीव्ही – ही अॅमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा वैविध्यपूर्ण व ओरिजनल तसेच डब केलेल्या दर्जेदार कंटेंटसाठी प्रसिद्ध असून जास्तीत जास्त प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी खास घोषणा करण्यात आली आहे. या सेवेने आपली व्याप्ती विस्तारण्यासाठी तमिळ व तेलुगु भाषेत डब केलेले 200 शोज आणि सिनेमे उपलब्ध केले आहेत.
डब केलेल्या शोजमध्ये चाहत्यांच्या आवडत्या हिंदी मिनीटीव्हीजचे शोज उदा.- हंटर- टुटेगा नही तोडेगा, फिजिक्ल वाला, देशभक्तीपर थरारक सीरीज – रक्षक इंडियाज ब्रेव्ह्ज, तरुण, रोमँटिंक सीरीज हायवे लव्ह यांचा समावेश आहे. त्याशिवाय प्रेक्षकांना हॉलिवुडचे तमिळ व तेलुगुमध्ये डब केलेले सिनेमे पाहायला मिळतील. त्यात ट्वायलाइट, नाउ यू सी मी, हंगर गेम्स सीरीज, स्टेप अप फ्रँचाईझी, रेड आणि इतर कंटेंटचा समावेश आहे. जास्त वैविध्यपूर्ण कंटेंट देण्याच्या हेतूने कोरियन, टर्किश आणि मँडरिन शोजही तमिळ व तेलुगुमध्ये डब करून उपलब्ध करण्यात आले आहेत.
अॅमेझॉन मिनीटीव्ही कंटेंट विभागाचे प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, ‘अॅमेझॉन मिनीटीव्हीमध्ये आम्ही प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचा व दर्जेदार कंटेंट पुरवण्याचे ध्येय ठेवले आहे. आम्ही प्रेक्षकांना प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट निवडण्याचे स्वातंत्र्य, त्यांच्या आवडत्या भाषेत शोज व सिनेमे पाहाण्याची संधी मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. विविध प्रकारच्या ओरिजनल व डब शोजचा समावेश असलेला आमचा कंटेंट संग्रह प्रेक्षकांना गुंतवून ठेवले याची खात्री वाटते.’
‘मिनीटीव्हीवरील ग्राहकांना आनंद देणारे शोज व सिनेमे त्यांच्या पसंतीच्या भाषेत मिळवून देत त्यांचा स्ट्रीमिंगचा अनुभव उंचावण्याचे आमचे ध्येय आहे. हा उपक्रम प्रादेशिक प्रेक्षकांना त्यांच्या पसंतीचा कंटेट उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील लक्षणीय टप्पा आहे. यामुळे आम्हाला नवे जाहिरातदार मिळवणे शक्य होईल. यासह नव्या भागिदारी करण्यासाठीही आम्ही उत्सुक आहोत,’ असे अॅमेझॉन मिनीटीव्हीच्या संचालक आणि व्यवसाय प्रमुख अरूणा दर्यानानी म्हणाल्या.
प्रादेशिक डब शोज अॅमेझॉन शॉपिंग अॅपमधील अॅमेझॉन मिनीटीव्हीवर मोफत तसेच प्राइम व्हिडिओ,
वर मोफत पाहायला मिळणार असून ते फायर टीव्ही, स्मार्ट टीव्हीवर पाहायला मिळेल तसेच प्लेस्टोअरवर अॅप डाउनलोड करता
येईल.


