पुणे, १९ एप्रिल २०२४ :इमेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये आघाडीवर असलेल्या निकॉन इंडिया प्रा.लि.ने कॅमेरा प्रेमींकरिता ‘माय निकॉन’ ॲप सादर केले आहे. कॅमेरा प्रेमींकरिता हा एक समर्पित कम्युनिटी प्लॅटफॉर्म आहे,जे वापरकर्त्यांच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून मोठी झेप आहे. ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी माय निकॉन’ ॲप हे अनेक फायदे प्रदान करते. निकॉन इन्फ्लुएन्सर्स आणि मेंटॉर्स पर्यंत सहज पोहोचण्यापासून ते सर्वसमावेशक डिजिटल अनुभवापर्यंत, वापरकर्ते ऑनसाईट व ऑफलाइन कार्यशाळेत भाग घेऊ शकता, लॉयल्टी पॉईंट्स आणि बक्षिसे मिळवू शकतात. या ॲप मुळे वापरकर्त्यांना रिटेल स्टोअर्स आणि सर्व्हिस सेंटरचा पत्ता शोधण्यास मदत होते, तसेच नवीन ऑफर्स आणि त्यांच्या पसंतीनुसार कॅमेरा आणि लेन्सच्या शिफारशी मिळू शकतात.


