Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedवैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे ऑक्सफर्ड विद्यापीठात...

वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित ‘ मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती आणि नेतृत्व विषयावरील परिषदेत’ डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे मत

 

पुणे, दि. २० एप्रिल : “आज जगामध्ये दहशतवाद, घातपात, रक्तपात, जातीय व धर्मवादामुळे अशांतता व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे कमी करण्यासाठी शिक्षण पद्धतीत वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यातुनच विश्वशांतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.” असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.

जगप्रसिद्ध व्यावसायिक ऑक्सफर्डच्या सेंट बिझनेस स्कूलच्या प्रतिष्ठित विद्यापीठात आयोजित मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती आणि नेतृत्व या विषयावरील एक दिवशीय परिषदेत ते बोलत होते.

यावेळी युके येथील बाथ विद्यापीठाचे सिनोलॉजिस्ट आणि कोर्स संचालक डॉ. युक्तेश्वर कुमार, प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ व मूल्यांवर आधारित शिक्षणाचे संस्थापक डॉ.नील हॉक्स, कार्डिफ विद्यापीठाचे फेलो प्रो ब्रायन फोर्ड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा.मिलिंद पात्रे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर हे निसर्ग तत्व आहे. आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे. परंतू आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही. जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्माचा अभ्यास होणे गरजचे आहे. तसेच मनाचे रसायनशास्त्र आजपर्यंत कोणालाही कळलेली नाही. त्यासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मनाच्या शास्त्राचा समावेश करावा.”

बाथ शहराचे विद्यमान नक्षराध्यक्षांनी आपल्या भाषणात डॉ. कराड यांनी निर्माण केलेल्या विश्वशांती घुुंमट हा मानवता आणि विश्व शांतीचा संदेश देत आहे. तसेच जागतिक शांततेसाठी त्यांची जी चळवळ सुरू आहे त्याल शुभेच्छा दिल्यात.

डॉ.नील हॉक्स यांनी सद्य परिस्थितीत मूल्यशिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील शैक्षणिक पॅटर्न लक्षात घेण्याजोग आहे. येथे दिल्या जाणार्‍या संस्कारामुळे विद्यार्थी हा सर्वगुण संपन्नाने तयार होईल. तसेच डॉ. कराड यांचे विश्वशांतीचे कार्य अद्वितीय असल्याचे सांगितले.

प्रो ब्रायन फोर्ड यांनी ग्रेट ब्रिटन मधल्या शैक्षणिक पॉलिसीवर सडकून टीका केली. आणि भारतीय शैक्षणिक पद्धती कशी चांगली आहे या वर भाष्य केले. तसेच त्यांनी ग्रेट ब्रिटन अधिकार शिक्षणाचा खालावत दर्जा त्याची उदाहरणे दिली.

आयोजित परिषदेत जगभरातील ७०हून अधिक विचारवंत व मान्यवर सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने अमेरिका, ग्रेट ब्रिटन, अल्बेनिया, रोम, इटली आणि भारतातील मान्यवर उपस्थित होते.

तसेच बीएपीएसचे स्वामी ज्ञानवत्सल दास, ब्रह्माकुमारी बीके जयंती दिदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश पाठविला. जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय पी. भटकर यांनी ऑनलाइन भाषण दिले.

प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रस्तावना मांडली. प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसं

चालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments