Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedनूमवीयांनी जपली सामाजिक बांधिलकी !!!

नूमवीयांनी जपली सामाजिक बांधिलकी !!!

पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी नेहमीच सामाजिक कामात स्वतःला झोकून देत असतात. नूतन मराठी विद्यालयाच्या १९७६ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘मन राम रंगी रंगले’ या सांगितिक कार्यक्रमाद्वारे श्रीरामांच्या चरित्राविषयी प्रेक्षकांना सहज व सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न केला.

 

भरत नाट्य मंदिराच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महर्षी वाल्मिकी यांनी श्रीरामांविषयी जो इतिहास लिहिला आहे. त्याचे निरूपण हिंदी व मराठी गीतांच्या मार्फत करण्यात आले. ख्यातनाम गायक कलाकार प्रज्ञा देशपांडे, केतन अत्रे व अर्णव पुजारी यांनी आपल्या ओजस व मधाळ स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर राजीव हसबनीस तर हार्मोनियमवर प्रसन्न बाम यांनी साथ दिली. विशेष म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांना अभंगवाणीत साथ देणारे टाळ वादक माऊली टाकळकर यांनी या कार्यक्रमात सर्व गीतांना अतिशय अमोल साथ दिली. टाकळकर यांनी भीमसेन व श्रीनिवास खळे यांच्यामधील सांगितिक संवादाबाबत आठवणही सांगितली. नूमवीयांतर्फे टाकळकर यांचा भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ख्यातनाम सूत्रसंचालक व नाट्य कलाकार रवींद्र खरे यांनी अतिशय सोप्या व खुमासदार शैलीमध्ये निरूपण केले. त्यांनी श्रीराम चरित्रामधील अनेक गोष्टींचा हल्लीच्या काळातही कसा संदर्भ आहे हे उदाहरणासह समजावून सांगितले. या कार्यक्रमास डॉक्टर राम साठ्ये, विनय कुलकर्णी, अभय जबडे हे उपस्थित होते.

 

या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर धनंजय शिरोळकर, जयंत रणधीर, कौशिक कुलकर्णी इत्यादींचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अतिशय भरघोस प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments