Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedभगवान महावीरांच्या विचारात विश्व कल्याण *उपाध्याय प पू प्रवीण ऋषी जी...

भगवान महावीरांच्या विचारात विश्व कल्याण *उपाध्याय प पू प्रवीण ऋषी जी महाराज*

प्रेस हे

पुणे -(प्रतिनिधी)

सत्ता आणि शास्त्राच्या आधारे विजय मिळवणारे जगात खूप देश आहेत, परंतु भगवान महावीर हे असे नाव आहे ज्यांनी सत्याच्या आधारे विजय मिळवला. त्यामुळे ते सर्वांपेक्षा खूप अनोखे आणि वेगळे आहेत. सर्व धर्म आम्ही श्रेष्ठ असल्याचा दिंडोरा पिटतात, त्यातूनच विश्वाचे कल्याण आहे असे संदेश देतात, परंतु या विचारांना शेवटपर्यंत पोहोचवणारे भगवान महावीरच आहे. विवेकच धर्म आहे आणि त्यातूनच विश्वकल्याण आहे. विवेक हाच धर्म असून ही प्रस्तुती तात्पुरती न घेता निरंतर घडली पाहिजे. महाविरानी आपल्याला भोजनातूनही अहिंसा शिकवली आहे, कर्तव्य आज एक उद्या वेगळे आहेत त्यामुळे निरंतर कार्य महत्त्वाचे. जगासमोर महावीर पर्याय म्हणून पुढे येऊ देऊ नका, महावीरांचे विचार हे एका दिवसासाठी नसून ते 365 दिवस निरंतर चालणारे आहेत. यावेळी महाराजांनी हिंदी विवेक मासिक पत्रिकेचे तोंड भरून कौतुक केले व भगवान महावीरांचे विचार एका दिवसापुरते सीमित न राहता निरंतर वेळोवेळी जगासमोर आणण्याचे आवाहन केले. महावीरांचे दिव्य दृष्टिकोन जगासमोर पोहोचले पाहिजेत यासाठी हिंदी विवेकने आपले कार्य चालू ठेवावे, असे सांगितले.

 

तीर्थंकर भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्त हिंदी विवेक प्रकाशित ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांकाचे प्रकाशन पुणे येथील गोयल गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडले. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनाचे औचित्य साधून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जैन मुनि यांनी महावीर वंदनेने केली. यावेळी कार्यक्रमाला उपाध्याय प. पू. प्रवीण ऋषि जी महाराज, रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे, सुहाना प्रवीण मसालेवाले चे डायरेक्टर विशालकुमार चोरडिया, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया तसेच जैन समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान हिंदी विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांच्या हस्ते उपाध्यय प. पू. प्रवीण ऋषि महाराज यांना पुस्तक साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सुनील आंबेकर म्हणाले, हिंदी विवेक विचार प्रबोधनाचे माध्यम आहे. कित्येक विषयांचे अचूक अध्ययन करून सतत विवेकच्या माध्यमातून समाजासमोर वेगळे विषय ठेवले जातात. आजचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, 2550 वर्षानंतरही या दिवसाची महानता लक्षात येते. शेकडो वर्षांपूर्वी दिलेले विचार आजही जिवंत आहेत येणाऱ्या समस्यांचे समाधान हवे असेल तर महावीरांच्या विचारांवर चालले पाहिजे. मानव कल्याणासाठी केलेली तपस्या जन्मोजन्मातर ची साधना त्यातून या मार्गांचे निर्माण झाले आहे. राष्ट्राची साधना हजारो वर्षांची आहे. विदेशींच्या आक्रमणात संत महात्म्यांनी आपल्या विचारातून राष्ट्राला मजबूत बनवले. आपल्या पूर्वजांनी मानव कल्याणच्या या विचारांवर विश्वास ठेवून विदेशी संकटांपासून राष्ट्राला वाचवले. संघर्ष काळात राष्ट्राच्या जीवन मूल्यांना आत्मसात केले या मूल्यांना आत्मसात केल्यानेच व्यक्ती चरित्रवान होतो. एकता, संस्कृती, महत्त्वाची. भौतिक सांस्कृतिक संपन्नता महत्वाची. अशा या कार्यात आपण सहभागी होऊन याच मार्गावर चालावे असे आवाहन त्यांनी केले. संतांचे वचन विचार विवेकने परिश्रमाने सर्वांसमोर ठेवले त्याबद्दल आंबेकर यांनी विवेक मासिक पत्रिकेच्या परिवाराचे अभिनंदन केले.

प्रमुख पाहुणे, वरिष्ठ लेखक पद्मश्री रमेश पतंगे यांनी जैन समाजाचे महत्व सांगितले. प्रत्येक देशाचे एक वेगळी ओळख असते अमेरिका भौतिक साधन संपन्न देश आहे, ब्रिटनला मदर पार्लमेंट म्हणतात अशाच प्रकारे भारताला मात्र धर्मभूमी म्हणून ओळखली जाते. ती टिकवून ठेवण्यासाठी संत महात्म्यांनी मोठे योगदान दिले. वेद काळापासून आजपर्यंत धर्मभूमी बनवून ठेवण्यात महावीरांचे कार्य अग्रणी आहे. राष्ट्रीय व्यक्तित्व बनवण्यासाठी महापुरुषांचे योगदान मोठे आहे. यावेळी पद्मश्री पतंगे यांनी भगवान महावीरांच्या विचारांवर चालणाऱ्या अहिंसा विचाराचे महत्व विशद केले. संविधानातील आर्टिकल 21 आपल्याला कशा प्रकारे महत्त्वपूर्ण आहे हे सांगितले. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणाचीही हत्या करता येत नाही. प्रत्येकाने अहिंसेचे पालन केले पाहिजे हे भगवान महावीरांचे विचार आजही संविधानाच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत.

विशालकुमार चोरडीया यांनी आपल्या संक्षिप्त भाषणात भगवान महावीरांना वंदन करून शुभेच्छा दिल्या. भगवान महावीरांचे विचार समजून घेतले पाहिजे तरच सुख शांतीची प्राप्ती होईल. महावीरांचे विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतील महावीरांनी सम्यक दृष्टिकोनातून आध्यात्मिक लाभ दिले त्यामुळे आपले जीवन समर्थ आहे. चोरडिया परिवार महावीरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले योगदान देईल. अशा विशेषांकाच्या माध्यमातून समाजभिमुख कामाचे फलस्वरूप सांगताना हिंदी विवेक टीमचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी उपस्थित मान्यवर सुनील आंबेकर, विशालकुमार चोरडिया, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया तसेच सुजय शाह, परेश शाह, अनिल नाहर, राजेंद्र बाठिया, प्रकाश धोका, वर्धमान शाह यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विशेषांकाच्या यशस्वीतेसाठी सहयोग देणारे प्रतिनिधि डॉ. दिलीप कुलकर्णी यांनाही गौरविण्यात आले.

हिंदी विवेकच्या मागील 14 वर्षांतील यशस्वीतेबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांनी आपल्या प्रास्ताविकेत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांच्या बहुमोल सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. उपाध्याय प पू प्रवीण ऋषी महाराज जी यांच्या सानिध्यात विमोचन कार्यक्रम ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात निवडणुकीचे वातावरण असताना इथे मात्र समाज परिवर्तनाचा विचार सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे, हे महत्त्वाचे. समाज परिवर्तनात महाराजांचे मोठे योगदान आहे त्यांनी उचललेला परिवर्तनाचा विडा अखंड समाजाला एकजूट ठेवतो. जो व्यक्ती स्वतः पोहतो तो दुसऱ्यालाही वाचवू शकतो, अशाप्रकारे दुसऱ्याची समस्या सोडवता येते, असे उपाध्याय प्रवीण ऋषी महाराजांचे विचार आहेत. भगवान महावीरांच्या कार्याकडे पाहिले तर त्यांनी विश्वाच्या हितासाठी साधना केली. त्यांचे विचार विश्वासाठी उपयुक्त ठरतात हे सर्व विचार विशेषांकातून वाचका पर्यंत पोहोचविण्याचे कार्य हिंदी विवेक मासिक पत्रिकेेने केले आहे असे म्हणाले. हिंदी विवेक ग्रंथ, विशेषांक, पुस्तक आदीच्या माध्यमातून राष्ट्र विचारांचे बीज वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहे. प्रत्येक समाज तसेच विस्मृत होत चाललेल्या महत्वपूर्ण साहित्याला पुन्हा झळाळी देण्याचे काम हिंदी विवेक उत्तरोत्तर करीत राहील, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हिंदी विवेकच्या कार्यकारी सम्पादक पल्लवी अनवेकर यांनी केले. आभार प्रशांत मानकुमरे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments