Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुर संगीताने उलगडले गीत रामायण आनंद माडगूळकर यांचे गीत...

सुर संगीताने उलगडले गीत रामायण आनंद माडगूळकर यांचे गीत रामायण सादरीकरण श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव

पुणे : तबल्याचा ठेका, टाळांचा निनाद, हार्मोनियमचे सूर आणि गायकांचे स्वर्गीय सूर या साथीला रामायणातील अद्भुत प्रसंग दाखविणारे कलाकार अशा भक्तिमय वातावरणात सूर आणि संगीताच्या साथीने जंगली महाराज महोत्सवात गीतरामायण उलगडले.

 

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात गीत रामायणाचे लेखक ग. दि. माडगूळकर यांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांच्या गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये आनंद माडगूळकर आणि सहकलाकारांनी रामायणातील विविध प्रसंग आपल्या मधुर वाणीने आणि वादनाने रसिकांसमोर सादर केले.

 

श्रेया माडगूळकर, मीनल पोंक्षे , राजेंद्र सबनीस (तबला), आनंद गोडसे, शुभदा आठल्ये ( हार्मोनियम) प्रणव कुलकर्णी (कीबोर्ड), अवधूत धायगुडे (तालवाद्य), राखी दातार, अवंतिका साठे (सह गायन) यांनी आनंद माडगूळकर यांना साथ सांगत केली, आनंद माडगूळकर यांचे सहाय्यक श्रीकांत कुलकर्णी आणि राजू कुलकर्णी यांचाही देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला.

 

आनंद माडगूळकर म्हणाले, जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सव पुण्यातील अतिशय प्रतिष्ठित महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये आपली कला सादर करण्याची अनेकांना इच्छा असते. या ठिकाणी मी नऊ वर्षानंतर दुसऱ्यांदा माझी कला सादर करत आहे.

 

ग. दि. माडगूळकर यांचे बंधू अंबादास माडगूळकर लिखित गदिमा स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजकुमार लव आणि कुश हे प्रभू श्रीरामांच्या समोर त्यांची गाथा सांगत आहेत असा प्रसंग उलगडणारे ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशल लव रामायण गाती’ या गीताने आनंद माडगूळकर यांनी गीत रामायणाची सुरुवात केली.

 

राणी कौशल्याच्या मनातील भाव टिपणारे ‘उगा का काळीज माझे ओले’, ‘पाहुनी वेलीवरची फुले’ हे गीत श्रेया माडगूळकर यांनी सादर केले. यानंतर कलाकारांनी ‘दशरथा तुझ्या यज्ञ मी प्रकट जाहलो हे माझे भाग्य’, ‘श्री विष्णूचा संदेश म्हणून आलो मी प्रसाद घेऊन’, ‘महाराण्यांच्या उदरी येतील ते महापुरुष’, ‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी किती गंधयुक्त तरी हा वाटे उष्ण’ ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला’ अशा विविध गीतांच्या माध्यमातून कलाकारांनी रामायणातील विविध प्रसंग रसिकांसमोर अक्षरशः जिवंत

केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments