Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्टार बाजार – वाकड मतदार जनजागृती अभियान

स्टार बाजार – वाकड मतदार जनजागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिपक सींगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली स्टार बाजार, दत्त मंदिर रोड, वाकड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 

सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टार बाजार शाखेतील अधिकारी, कर्मचारी व २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये या भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच देशहितासाठी मतदान करा, “ आपले मत, आपला हक्क, चला मतदान करूया ” असा संदेश देण्यात आला. यानंतर कर्मचा-यांकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेणेत आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments