Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅप्रिलिया इंडियाकडून ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून जॉन अब्राहम यांची घोषणा; व्‍यापक सुपरबाइक पोर्टफोलिओ...

अॅप्रिलिया इंडियाकडून ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून जॉन अब्राहम यांची घोषणा; व्‍यापक सुपरबाइक पोर्टफोलिओ लाइनअप सादर

पुणे, भारत – एप्रिल १८, २०२४

अॅप्रिलिया या उच्‍च-कार्यक्षम मोटरसायकल्‍सच्‍या प्रख्‍यात उत्‍पादक कंपनीने ब्रँडसाठी उत्‍साहवर्धक पोर्टफोलिओचे नेतृत्‍व करण्‍यासाठी भारतातील ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून जॉन अब्राहम यांची घोषणा केली आहे. स्‍वत: मोटरसायकलप्रेमी असलेले जॉन अब्राहम देशामध्‍ये सुपरबाइक संस्‍कृतीला उत्तमरित्या दर्शवतात. अॅप्रिलियाने भारतातील बाजारपेठेसाठी अधिकृतरित्‍या आपला व्‍यापक सुपरबाइक पोर्टफोलिओ – आरएसव्‍ही४ फॅक्‍टरी, आरएस६६०, टूयूनो ६६० आणि ट्यूआरेग ६६० लाँच केला, जो देशातील सुपरबाइकप्रेमींसाठी मोठा क्षण ठरला. या सर्व सुपरबाइक्‍स भारतभरातील अॅप्रिलिया मोटोप्‍लेक्‍स डिलरशिप्‍सच्‍या माध्‍यमातून कम्‍प्‍लीटली बिल्‍ट-अप युनिट्स (सीबीयू) म्‍हणून उपलब्‍ध आहेत.

अॅप्रिलिया इंडियाला त्‍यांचे ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून समर्पित अॅप्रिलिया चाहते जॉन अब्राहम यांचे स्‍वागत करताना अभिमान वाटत आहे. जॉन अब्राहम यांच्‍यासोबतचा हा सहयोग अत्‍यंत उत्‍साहवर्धक आहे. अब्राहम यांची उच्‍च-कार्यक्षम मोटरसायकल्‍सप्रती आवड अॅप्रिलियाचा रेसिंग हेरिटेज व वारसाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. ते भारतातील बाइकिंगची आवड असलेल्‍या संपन्‍न समुदायांशी संलग्‍न आहेत. ते ब्रँड अॅम्‍बेसेडर असण्‍यासोबत निस्‍सीम चाहते, राइडर देखील आहेत, ज्‍यामधून अॅप्रिलियाचा उत्‍साह दिसून येतो.

अॅप्रिलिया इंडियाच्‍या कार्यक्षम पोर्टफोलिओचे अनावरण करताना जॉन अब्राहम म्‍हणाले, “मला अॅप्रिलियासोबत त्‍यांचा ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. मी स्‍वत: अॅप्रिलिया ब्रँडशी संलग्‍न आहे, जो आवड, कार्यक्षममता व स्‍टाइलचे प्रतीक आहे. मला असा प्रशंसनीय वारसा असलेल्‍या ब्रँडचा भाग असण्‍याचे सन्‍माननीय वाटते. मी अॅप्रिलियाच्‍या प्रवासाचा भाग असण्‍यास उत्‍सुक आहे, जेथे हा ब्रँड उच्‍च-कार्यक्षम बाइक्‍ससाठी ओळखला जातो, ज्‍यामधून स्‍पोर्ट, रेसिंग व साहसाचा उत्‍साह दिसून येतो.”

पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्‍हणाले, “आम्‍हाला अॅप्रिला कुटुंबामध्‍ये जॉन अब्राहम यांचे स्‍वागत करताना खूप आनंद होत आहे. जॉन यांची कार्यक्षमता, साहस व सर्वोत्तमतेप्रती आवड अॅप्रिलियाच्‍या उत्‍साहाशी परिपूर्ण संलग्‍न आहे. हा सहयोग निश्चितच आमच्‍या ब्रँड दृष्टिकोनाला प्रबळ करेल आणि थरारक राइड अनुभव देण्‍यासह स्‍टायलिश दिसणाऱ्या मोटरसायकलची आवड असलेल्‍या प्रत्‍येक राइडरशी संलग्‍न होईल.”

कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन अँड मार्केटिंगचे प्रमुख श्री. अपूर्व सैगल म्‍हणाले, “अॅप्रिलियाचे ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून जॉन अब्राहम यांची नियुक्‍ती आमच्‍या ब्रँड प्रवासामधील मोठे संपादन आहे. जॉन यांना मोटरसायकलिंगप्रती असलेली आवड आमच्‍या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना प्रभावित करते आणि जॉन यांचा जनतेमधील प्रभाव अॅप्रिलियाची पोहोच वाढवण्‍यामध्‍ये, तसेच अधिकाधिक उत्साहित राइडर्सशी कनेक्‍ट करण्‍यामध्‍ये साह्यभूत ठरेल. सहयोगाने, आम्‍ही अॅप्रिलिया मोटरसायकल राइड करण्‍याच्‍या रोमांचला प्रशंसित करणाऱ्या मोहिमा डिझाइन करण्‍यास उत्‍सुक आहोत.”

***

अॅप्रिलिया बाबत:

अॅप्रिलिया हा मोटरसायकल ब्रँड आहे, जो सर्वोत्तम मोटरसायकल्‍स निर्माण करण्‍यासाठी ओळखला जातो. परिपूर्ण रचनेच्‍या प्रयत्‍नात कंपनीने आपल्‍या चाहत्‍यांना उत्तम निष्‍पत्ती प्रदान केल्‍या आहेत. अलिकडील वर्षांमध्‍ये अॅप्रिलियाने आपल्‍या उत्‍पादन श्रेणीमध्‍ये पूर्णत: सुधारणा केल्‍या आहेत, ज्‍यामुळे स्‍कूटर व मोटरसायकल विभागामध्‍ये पियाजिओ ग्रुपची तंत्रज्ञान साइनपोस्‍ट बनली आहे. रोड रेसिंग वर्ल्‍ड चॅम्पियनशीपमध्‍ये २९७ ग्रँड प्रिक्‍स रेसेस जिंकण्‍यासह अॅप्रिलियाचा अधिकतम मोटरसायकल स्‍पर्धांच्‍या इतिहासामध्‍ये कोणत्‍याही युरोपियन उत्‍पादकांसाठी सर्वाधिक विजयाचा रेकॉर्ड आहे. यामध्‍ये प्रभावी ५४ जागतिक टायटल्‍सचा समावेश आहे: रोड रेसिंग वर्ल्‍ड चॅम्पियनशीपमध्‍ये ३८, सुपरबाइकमध्‍ये ७ आणि ऑफ-रोड डिसीप्‍लीन्‍समध्‍ये ९.

पीव्‍हीपीएल बाबत:

१८८४ मध्‍ये स्‍थापित पियाजिओ ग्रुप युरोपमधील सर्वात मोठी स्‍कूटर व मोटरसायकल उत्‍पादक आणि उद्योगामधील जागतिक अग्रणी कंपनी आहे.

पीव्‍हीपीएल व्‍यावसायिक वाहने व दुचाकींची इन्‍व्‍हेंटर इटलीमधील पियाजिओ अँड सी. एस.पी.ए.ची १०० टक्‍के उपकंपनी आहे. पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) आज आपल्‍या व्‍यावसायिक वाहने व दुचाकी वाहने विभागांसह लीगचे नेतृत्‍व करते. देशातील तीनचाकी कार्गो विभागात क्रांती घडवून आणत पियाजिओ आज सेवेच्‍या विविध क्षेत्रांमध्‍ये जागतिक मानक स्‍थापित करत आहे. कंपनी वेस्‍पा व अॅप्रिलिया अशा लीजेण्‍डरी दुचाकी ब्रँड्सची मालक देखील आहे, जे दुचाकी उद्योगामध्‍ये लक्‍झरी विभाग आहेत. पीव्‍हीपीएलचे विस्‍तृत उत्‍पादन युनिट महाराष्‍ट्रातील बारामती येथे आहे आणि भारत व निवडक आतंरराष्‍ट्रीय बाजारपेठांसाठी व्‍यावसायिक वाहने व दुचाकी उत्‍पादित करण्‍यासाठी काम करते.

पीव्‍हीपीएलचा दृष्टिकोन व मिशन अद्वितीय, उच्‍च-प्रभावी, जलद प्रतिसाद देणारी, नाविन्‍यपूर्ण व विकास-केंद्रित कंपनीचा बनण्‍याप्रती आहे, जी अद्वितीय सर्वोत्तमतेसाठी ओळखली जाईल. तसेच देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठांमधील ग्राहकांच्‍या समाधानासाठी उच्‍च दर्जाच्‍या उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी उत्‍पादित आणि विपणन करणारी जागतिक दर्जाची कंपनी असण्‍याचा देखील मनसुबा आहे. अद्वितीय कस्‍टमर केअर, अत्‍याधुनिक उत्‍पादने आणि सन्‍मानित करण्‍यात येणाऱ्या विविध पुरस्‍कारांसह पीव्‍हीपीएलने आपला प्रवास सुरू ठेवला आहे, जो प्रेरणादायी असण्‍यासह भारतातील लाखो व्‍यक्‍तींना सुधारित जीवनाचा दर्जा प्रदान

करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments