लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली स्मार्ट सुपरस्टोर – पिंपळे निलख येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी स्मार्ट सुपरस्टोअरचे व्यवस्थापक, कर्मचारी व २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. तसेच स्मार्ट सुपरस्टोरचे व्यवस्थापक श्री.अतिश गाडेकर, श्री.तुषार ढगे, श्री.नितीन सोनवणे आणि श्रीम.टिलोटमा बोरसे यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली.
यामध्ये कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच “वृध्द असो किंवा जवान, सर्वजण करा अवश्य मतदान” असा संदेश देण्यात आला. यानंतर कर्मचा-यांकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेणेत आली.


