Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोस्टर्स, स्टीकर्सच्या माध्यामातून मतदार जनजागृती अभियान

पोस्टर्स, स्टीकर्सच्या माध्यामातून मतदार जनजागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राअंतर्गत येणाऱ्या शाळा, कॉलेज, बस स्टॉप आणि उद्यान तसेच पेट्रोल पंप या सार्वजनिक ठिकाणी मतदान जनजागृती करण्यासाठी पोस्टर्स, स्टीकर्स लावण्यात आले आहेत.

 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक कलात्मक उपक्रम हाती घेतले आहेत, याच पार्श्वभूमीवर मतदान केंद्राअंतर्गत येणाऱ्या शाळा, कॉलेज, बस स्टॉप आणि उद्यान तसेच पेट्रोल पंप या सार्वजनिक ठिकाणी मा.जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या पोस्टर्स, स्टीकर्स २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीमद्वारे विविध ठिकाणी लावण्यात येऊन मतदान जनजागृती करण्यात आली

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments