Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedतुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा* श्री रामजी संस्थान...

तुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा* श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्या वतीने आयोजन ; कीर्तनकार दर्शनबुवा वझे यांचे हनुमान जन्माचे कीर्तन

 

पुणे : श्रीराम-लक्ष्मण-जानकी… जय बोलो हनुमान की… अशा शब्दांत हनुमानाच्या चरित्राचे वर्णन करीत हनुमान जन्माचे कीर्तन पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरात पार पडले. श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे व दागिने घालण्यात आले होते. तर, मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली.

 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी झाली. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६३ वे वर्ष साजरे झाले.

 

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन झाले. याशिवाय उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा देखील पार पडला. तसेच, पं. शौनक अभिषेकी, गौरी पाठारे, पं. श्रीधर फडके यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments