मुंबई, २३ एप्रिल २०२४ : साकेत सेव्हन स्टार इंडस्ट्रीज प्रा.लि.(एसएसएसआयपीएल) आणि रॉलप्लग प्रॉडक्टस अॅन्ड सर्व्हिसेस प्रा.लि.ने भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रात अभिनवता आणि उत्कृष्टतेत नवे पर्व सुरू करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या महत्त्वाच्या भागीदारीच्या माध्यमातून रॉलप्लगने भारतात अधिकृतरित्या प्रवेश केला असून ही भागीदारी देशातील बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्राचे भविष्य पुर्नपरिभाषित करण्याची बांधिलकी दर्शविते.
रॉलिंग्स ब्रदर्स नामक एक छोटी प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी कंपनी लंडनमध्ये 1887 साली स्थापन होत अभियांत्रिकी कल्पकतेच्या समृद्ध इतिहासात रुजलेल्या रॉलप्लगची उत्पत्ती झाली.1910 मध्ये जगातील पहिल्या वॉल प्लगचा शोध लावल्यानंतर कंपनीला पहिले यश मिळाले, ज्यामुळे बांधकाम आणि डीआयवाय उद्योगांमध्ये क्रांती घडून आली. 1919 मध्ये कंपनीने नाव बदलून रॉलप्लग हे नाव ठेवण्यात आले. कंपनी बांधकाम उद्योगासाठी फिक्सिंग तंत्रज्ञान आणि उपकरणे विकसित करण्यात आघाडीवर असून उद्योग मानकांप्रमाणे उत्पादनांची आणि सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करते.
याशिवाय, साकेत सेव्हन स्टार इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड (एसएसएसआयपीएल ) ही महाराष्ट्रातील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी एक आहे, जी घरातील उत्पादनांसाठी झिंक आणि ॲल्युमिनियम फ्लेक कोटिंग आणि मेकॅनिकल झिंक कोटिंग प्रदान करते. तसेच उत्पादने, या भागातील प्रीमियम फास्टनर कंपन्यांसाठी विश्वासार्ह सेवा देतात. गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेच्या कटीबद्धतेसह,एसएसएसआयपीएल ने अभियांत्रिकी क्षेत्रात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे,जी एक मजबूत आणि शाश्वत भारताचा दृष्टीकोन पुढे घेऊन जात आहे.
बांधकाम व्यावसायिक आणि डीआयवाय क्षेत्रात कार्यरत लोकांसाठी व्यापक सोल्युशन्स प्रदान करणाऱ्या रॉलप्लगच्या विस्तृत उत्पादन श्रेणीमध्ये पॉवर टूल्स, डायरेक्ट फास्टनिंग सिस्टिम्स, हँड टूल्स, अँकर, फिक्सिंग, स्क्रू, फास्टनर्स, सीलंट आणि ॲडेसिव्ह, वूड कनेक्टर्स, चेन आणि रोप्स आणि डीआयवाय किट्स यांचा समावेश आहे.बांधकाम पद्धतींमध्ये सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कटिबद्ध असलेले रॉलप्लग ग्राहकांना सर्वोत्तम परिणाम साध्य करण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य सेवांसह अग्निसुरक्षा प्रणाली आणि तांत्रिक सॉफ्टवेअर देखील प्रदान करते.
जागतिक स्तरावर नावीन्यपूर्णता आणि विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध असलेल्या रॉलप्लग ने साकेत सेव्हन स्टार इंडस्ट्रीज प्रा.लि. सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे भारतातील अभियांत्रिकीच्या भविष्याला चालना देणारे अद्वितीय उपाय, संपूर्ण देशामध्ये शाश्वत विकास घडवून आणण्यास मदत होणार आहे.


