टर्म इन्शुरन्स/मुदत विमा घेण्यात भारतातील पश्चिम भाग आघाडीवर; तीन पैकी एकाने भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी घेतले टर्म प्लॅन्स: मॅक्स लाईफच्या आयपीक्यू ६.० च्या सर्वेक्षणात महत्त्वाच्या बाबी समोर
मॅक्स लाईफ आयपीक्यू सर्वेक्षणातले महत्त्वाचे मुद्दे
• पश्चिम भारताची आर्थिक स्थैर्याच्या मुद्द्यावर प्रोटेक्शन कोशंटमध्ये ४ पॉइंटची आघाडी- सर्व विभागात उच्चांक
पश्चिम भारतातील शहरी भागात तीन पैकी एकाने टर्म प्लॅनमध्ये गुंतवणूक करून आर्थिक सुरक्षिततेत ६० पॉइंट्सने आघाडी घेतली आहे.
• महानगरांमध्ये फायनान्शिअल प्रोटेक्शन कोशंट मध्ये मुंबईचा पहिला क्रमांक. तसंच विम्याच्या बाबतीत १०० टक्के सजगता.
मुंबईतील दहा पैकी सहा लोकांकडे टर्म इन्श्युरन्स आहे. गेल्या काही वर्षातली ही लक्षणीय वाढ आहे.
25 एप्रिल 2024 मुंबई- मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने (मॅक्स लाइफ/ कंपनी) आज त्यांच्या इंडियन प्रोटेक्शन कोशंट स्टडी या सर्वेक्षणाचे पश्चिम विभागाचे निकाल जाहीर केले.. कंटार या जगातील आघाडीचे मार्केटिंग डेटा आणि अॅनालिटिक्स कंपनी च्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. 25 भारतीय शहरात 4700 लोकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात भारतातील नागरी भागात आर्थिक सुरक्षेबद्दलचे दृष्टिकोन तपासण्यात आले.
आय पी क्यू 6.0 या सर्वेक्षणात पश्चिम भारतात आर्थिक सुरक्षेबाबत अधिक जागरूकता असल्याचे लक्षात आले. या विभागाचा प्रोटेक्शन कोशंट मागील वर्षीच्या बेचाळीस पासून 46 पर्यंत वाढला. सर्व विभागाची तुलना करता या विभागाने सर्वात मोठी झेप घेतली आहे. आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता पश्चिम भारत विभागात अनिश्चिततेची परिस्थिती हाताळण्यासाठी तयारी प्रचंड प्रमाणात दिसून आली. ती 59% असून कोविड पूर्वकाळात इतकी पातळी आहे.
या सर्वेक्षणात प्रतिसाद दिलेल्या यांपैकी 72 टक्के लोकांनी इन्शुरन्स पॉलिसी मध्ये गुंतवणूक केली आणि त्यामुळे पश्चिमेकडील राज्यात आर्थिक सुरक्षा ते बाबत अधिक जागरूकता पसरल्याचे दिसून येत आहे. विशेषतः टर्म इन्शुरन्स च्या बाबतीत मोठी वाढ झाली आहे. आय पी क्यू 5.0 च्या वेळी ही 29 टक्के होती. ती आता 36 टक्क्यापर्यंत वाढली आहे तर इन्शुरन्स बाबत पॉलिसी धारकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागत आहे. आपलं टर्म कव्हर पुरेसं आहे असा विश्वास असणाऱ्या लोकांमध्येही वाढ होत आहे. आयपी क्यू 5.0 मध्ये 53% लोकांना असं वाटलं होतं यावर्षीच्या सर्वेक्षणात हा आकडा 62% आहे.
मॅक्स लाईफ इन्श्युरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत त्रिपाठी म्हणाले, “ या भागात आर्थिक सजगता वाढवण्यासाठी मॅक्स लाईफ चा इंडिया प्रोटेक्शन कोशंट- वेस्ट झोन हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. जागरुकता ही आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि विमा गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या सहा वर्षांत या विभागात वाढलेली जागरुकता लक्षणीय आहे. त्यामुळे लोक मोठ्या संख्येने विमा घेत आहेत. विमा हा सुरक्षित भविष्याचा पाया आहे हे लोकांनी आता स्वीकारल्याचं या सर्वेक्षणातून दिसून येतं. आता वैश्विक पातळीवर आर्थिक सुरक्षेबद्दल जागृती करण्यासाठी इंडिया प्रोटेक्शन कोशंट सर्व भागधारकांसाठी एक मार्गदर्शक ठरला आहे. यामुळे भारतातील सर्व विभागातील आणि समुदायातील लोकांना सेवा पुरवण्यासाठी हे सर्वेक्षण कामास येईल.”
पश्चिम भारतात आर्थिक प्राधान्यक्रम, दृष्टिकोन, वागणूक कशी बदलली आहे हे खालील मुद्द्यांद्वारे लक्षात येईल.
माहिती निर्देशांकात मुंबई आघाडीवर
यावर्षीच्या आयपीक्यू मध्ये मुंबईमधील लोक अनिश्चिततेसाठी अधिक प्रमाणात तयार झाल्याचे लक्षात आले. या सर्वेक्षणात मुंबईतील आर्थिक सुरक्षा निर्देशांक ६१ पॉइंटवर असल्याचं लक्षात आले. आयपीक्यू ५.० मध्ये तो ५८ वर होता. मुंबईच्या लोकांचा माहिती निर्देशांक ८४ आहे. तो महानगरातील सर्वोच्च आहे. त्यामुळे भविष्याच्या सुरक्षिततेलाठी विम्याची चांगली माहिती असल्याचे या सर्वेक्षणातून लक्षात आले आहे. मुंबईतील ८४ टक्के लोकांकडे विमा आहे. महानगरांमध्ये मुंबईचा तिसरा क्रमांक आहे. त्यात चेन्नईचा पहिला क्रमांक (९२%) आणि दिल्लीचा दुसरा क्रमांक (८५%) आहे.
पश्चिम भारतात विमा हप्त्यापेक्षा एकूण विमा आणि वैशिष्ट्यांवर भर
भारतातील शहरी भागात विम्याच्या एकूण रकमेला आणि उत्पादनाच्या वैशिष्ट्यांवर विमा घेताना जास्त भर दिला जात आहे. त्यात हप्त्याच्या रकमेकडे जास्त लक्ष दिले जात नाही. आयपीक्यू ५.० मध्ये टर्म इन्श्युरन्स ५४% लोकांनी घेतला होता. आयपीक्यू ६.० मध्ये हा आकडा ५९% होता. विम्याच्या वैशिष्ट्यांवर भर देण्याचे प्रमाण ५६% पासून ६५% पर्यंत गेलं आहे. तसंच टर्म रायडरचे प्रमाण ३५% वरून ५७% वर गेले आहे.
आर्थिक दृष्टिकोन सुधारल्यामुळे पश्चिम विभागाचा आर्थिक सुरक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोन
पश्चिम भारतात आर्थिक सुरक्षा आणि आयुष्यातील अनिश्चिततेकडे पाहण्याच्या तयारीबद्दल आयपीक्यू ६.० मध्ये जी प्रगती दिसली त्यावरून ग्राहकांना त्यांच्या आर्थिक स्थैर्याबद्दल आत्मविश्वास वाढत असल्याचे लक्षात आले आहे. वैद्यकीय खर्चाचं व्यवस्थापन करण्याच्या संदर्भातला विश्वासही वाढला आहे. आयपीक्यू ५.० मध्ये हा आकडा ६० टक्के होता. आयपीक्यू ६.० मध्ये तो ६६ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे आरोग्यसेवेचा खर्च लोकांच्या आवाक्यात आल्याचं हे लक्षण आहे. तसंच लोकांना आता त्यांच्या नोकरी, व्यवसायाबद्दल सुरक्षितता वाढते आहे. हे प्रमाण आधी ५७% होतं आता ते ६४% होतं. तसंच लहान मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाबद्दलचा आत्मविश्वास वाढीला लागला आहे. तीन पैकी दोन लोकांनी याबद्दल आत्मविश्वास दर्शवला आहे.
भारताच्या पश्चिम भागात बचतीबद्दल जागरुकता वाढली
पश्चिम भारतातील नागरी भागात बचतीबद्दल जागरुकता वाढली आहे. घर घेणे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी बचत करणे या पारंपरिक प्राधान्याच्या गोष्टी आता मागे पडल्या आहेत. सुट्ट्या आणि प्रवासासाठी बचतीचा ट्रेंड वाढतो आहे. आयपीक्यू ५.० मध्ये हे प्रमाण ७% होतं. आता ते १४% झालं आहे. या विभागातील २३% लोकांनी लवकर निवृत्ती घेण्याच्या उद्दिष्टाला प्राधान्य दिले आहे आणि ते बचतीचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असं या लोकांनी सांगितलं.
चांगलं आरोग्य राखण्याच्या कोशंटमध्ये वाढ
आयपीक्यू ६.० या सर्वेक्षणात शहरी भागातील २ पैकी एकजण चालणं, जिम, योगा आणि व्यायामासारख्या गोष्टी नियमित करतात. आरोग्य आणि फिटनेस तंत्रज्ञान आत्मसात करण्याबद्दल कमालीची वाढ झाली आहे. फिटनेस बँड आणि हेल्थ मॉनिटरिंग डिव्हायसेस जास्तीत जास्त लोक वापरत असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
खरेदी करण्याबाबत डिजिटल विश्वाला प्राधान्य- टर्म इन्श्युरन्स समजून घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार
सध्याच्या डिजिटल विश्वात पश्चिम भारतातील शहरी नागरिक फेसबूक, ट्विटर, लिंक्डिन सारख्या प्लॅटफॉर्मवर टर्म इन्श्युरन्सच्या माहितीचा पहिला स्रोत म्हणून जात आहेत. आयपीक्यू ६.० मध्ये ही बाब समोर आली आहे. फेसबूक, ट्विटर आणि लिंक्डिन हे माहितीचे महत्त्वाचे स्रोत म्हणून उदयाला आले आहेत. तिथे ग्राहकांना विविध प्रकारची माहिती मिळते, लोकांची, मित्रमैत्रिणींचीं, तज्ज्ञांची मतं कळतात. या विभागातील लोक संवादाची माध्यमं म्हणून व्हॉट्स अप आणि व्हॉईस असिस्टंट प्लॅटफॉर्मला प्राधान्य देत आहे. त्यातून अशा प्रकारच्या सोयींची आणि कंपन्यांशी संवादाच्या गरजेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. तसंच निर्णय़ घेण्यासाठी ऑनलाईन रिव्ह्यू सुद्धा महत्त्वाचे ठरत आहेत. यामुळे ग्राहकांना एखादा विमा घेण्यासाठी कंपनीची विश्वासार्हता आणि अवलंबित्व याबद्दल निर्णय घेण्यास मदत होते.


