Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorized‘दिव्यांग मतदान जनजागृती मोटार वाहन रॅलीचे’ आयोजन

‘दिव्यांग मतदान जनजागृती मोटार वाहन रॅलीचे’ आयोजन

पिंपरी ,दि. ८ मे २०२४ :- पिंपरी चिंचवड महापालिका, अपंग सहाय्य संस्था चिंचवड आणि घरकुल अपंग सहाय्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसभा निवडणूक २०२४ मतदान जनजागृतीसाठी व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘दिव्यांग मतदान जनजागृती मोटार रॅलीचे’ आयोजन ९ मे २०२४ रोजी करण्यात आले आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पहिल्यांदाच या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या मतदान जनजागृती मोटार रॅलीची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरातील ठराविक रस्त्याने सकाळी ९:०० वाजता करण्यात येणार असून दुपारी १२:०० वाजता ही रॅली संपन्न होईल. तसेच या रॅलीची सुरुवात निगडी येथील भक्ती – शक्ती स्मारक येथून होणार असून दिव्यांग भवन, मोरवाडी पिंपरी येथे ही रॅली संपन्न होणार आहे.

 

मतदान जनजागृती मोटार रॅलीचा मार्ग हा भक्ती शक्ती येथून सुरु होऊन अप्पू घर कॉर्नर, मूकबधिर शाळा, हेडगेवार भवन, संभाजी चौक, बिजलीनगर ब्रिज, चिंचवडे कॉर्नर, चिंचवड जुना जकात नाका, बिर्ला हॉस्पिटल, मोरया मंगल कार्यालय, ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव, तापकीर चौक, रहाटणी, पिंपळे सौदागर, महादेव मंदिर, नाशिक फाटा, भोसरी, लांडेवाडी, गवळी माथा, नेहरूनगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, दिव्यांग भवन मोरवाडी पिंपरी याठिकाणी संपन्न होणार आहे.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments