Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेशवेकालीन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नवरात्र महोत्सव आजपासून सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी...

पेशवेकालीन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नवरात्र महोत्सव आजपासून सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचे द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष : महोत्सवात विविध धार्मिक, सांगीतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : सदाशिव पेठेतील पेशवेकालीन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर यंदा द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. मंदिरात दिनांक ११ ते २२ मे दरम्यान नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. महोत्सवात विविध धार्मिक, सांगीतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध याग, कीर्तन तसेच दिग्गज कलाकारआपली कला सादर करणार आहेत. अशी माहिती मंदिराचे अभिजीत जोशी यांनी दिली.

 

सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोरील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात हा नवरात्र महोत्सव होणार आहे. दिनांक १३ मे ते २१ मे पर्यंत दररोज सकाळी ७ वाजता श्री गणेश याग, नवचंडी याग, विष्णू याग, दत्तयाग, सुदर्शन याग, नृसिंह याग, विष्णू याग, सौर याग, रुद्र याग, नृसिंह याग होणार आहेत. शनिवार दिनांक ११ मे रोजी महिलांमधील स्तन कर्करोग आणि सर्वाइकल कर्करोग तपासणी शिबिर तसेच १२ मे रोजी विनामूल्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ ते २१ मे दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० वाजता किर्तन होणार आहेत. ह.भ.प. श्रेयस बडवे आणि सदानंदबुवा ताम्हणकर हे कीर्तन सेवा देणार आहेत.

 

महोत्सवात दररोज रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये आर्या आंबेकर, पं.आनंद भाटे, हेमंत पेंडसे, विजय कोपरकर, अतुल खांडेकर, मंजुषा पाटील, अभेद अभिषेकी, विराज जोशी, गंधार देशपांडे, संजीव अभ्यंकर यांचे गायन तर मिलिंद कुलकर्णी पं. रामदास पळसुले यांचे एकत्र वादन होणार आहे. शरद पोंक्षे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावरील व्याख्यान देखील महोत्सव होणार आहे.

 

अभिजीत जोशी म्हणाले, मंदिराला 250 वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्त मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. महोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी आणि रोषणाई करण्यात आली आहे.

 

पेशवेकालीन इतिहास आणि वासुदेव बळवंत फडकेंचा सहवास लाभलेलं लक्ष्मी नृसिंह मंदिर…

 

महाराष्ट्रात आणि भारतात लक्ष्मी नृसिंहाची मंदिरे मोजकीच आहेत. अशाच काही मोजक्या मंदिरांपैकी एक मंदिर पुण्यातील सदाशिव पेठेत आहे. सदाशिव पेठ वसण्याच्या आधीपासून हे मंदिर अस्तित्वात आहे या भागाला पूर्वी कारकोळपूर असे म्हटले जात. या मंदिराची स्थापना इसवी सन १७७४ ला आषाढ दशमीच्या दिवशी झाली. या मूर्तीचा आणि मंदिराचा इतिहासही रंजक

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments